शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विजेची मागणी वाढली, महाराष्ट्राचे वरदायिनी असलेल्या कोयना धरणात नेमका किती पाणीसाठा..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:55 IST

महाराष्ट्राचे वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणावर राज्याची वीज आणि शेती पिण्याच्या पाण्याची गरज भागवत आहे

कोयनानगर : कोयना धरणातील पाणी १ जून ते ३१ मे या तांत्रिक वर्षात कृष्णा पाणी वाटप लवादानुसार धरणाच्या पूर्व व पश्चिमेकडे विसर्ग केले जाते. चालू तांत्रिक वर्षातील ११ महिने संपले असून, अजून २३ दिवस शिल्लक असताना. कोयना धरणात ३४.२३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे वीजनिर्मिती व सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे.महाराष्ट्राचे वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणावर राज्याची वीज आणि शेती पिण्याच्या पाण्याची गरज भागवत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे संपूर्ण राज्याचे नेहमीच लक्ष असते. कोयना धरणाची १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असून, धरणातील पाण्यापासून सुमारे २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील ६७.५० टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तर उर्वरित पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणीवाटप लवादानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीसाठी हा तांत्रिक पाणी करार असतो. यावर्षी कोयना धरणाच्या १ जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील ८ मे पर्यंतचा कालावधी संपला असून तांत्रिक वर्ष संपायला काही दिवस शिल्लक असताना वीजनिर्मितीसाठी ६७.५० टीएमसीपैकी ५९.८१ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी झाला असला तरी अजूनही ८.६९ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी शिल्लक आहे.कोयना पाणलोट क्षेत्रात जुलै, ऑगस्ट महिन्यांत पडलेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात पाण्याची ऐतिहासिक आवक झाल्याने कोयना धरण पूर्ण भरले होते. सोमवार, दि. ८ मेच्या सकाळपर्यंत धरणातून पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी ५९.८१ टीएमसी व पूर्वेला पायथावीजगृहातून पूरस्थिती व सिंचनासाठी सोडलेल्या ८९.३७ टीएमसी असा एकूण ९९.१८ टीएमसी पाण्याचा वापर करत कोयना जलविद्युत प्रकल्पातून एकूण २८५४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली आहे. धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी ७.२८ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. तर ०.०२ टीएमसी पाण्याची गळती झाली आहे. कर्नाटक राज्याने केलेल्या मागणीनुसार व महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागातील पाण्याची टंचाई भासत असल्याने कोयना धरणाच्या पायथावीजगृहातून २१०० व नदी विमोचकातून २१०० असा एकूण ४२०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.सध्या विजेची मागणी वाढली असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चारही टप्प्यांतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे.धरणातील वीजनिर्मितीसाठी ६७.५ टीएमसी पाणीसाठा आरक्षितपैकी ६० टीएमसी वापर झाला असून, सुमारे ६ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी शिल्लक आहे. गतवर्षी कोळसा टंचाई काळात सुमारे १५ टीएमसी पाण्याचा अतिरिक्त वापर करत ८२.६४ टीएमसी पाण्यापासून ३८७०.९० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली होती.

गतवर्षीप्रमाणे आताही अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी सात टीएमसी पाण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. -एस. जी. चोपडे, मुख्य अभियंता महाजनको, पोफळी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणelectricityवीज