माण तालुक्यातील रिक्त पदे भरण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:40+5:302021-06-05T04:27:40+5:30

म्हसवड : माण तालुका पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रा. ...

Demand to the Animal Husbandry Minister to fill the vacancies in Maan taluka | माण तालुक्यातील रिक्त पदे भरण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांकडे मागणी

माण तालुक्यातील रिक्त पदे भरण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांकडे मागणी

म्हसवड : माण तालुका पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्राचे पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यविकास मंत्री सुनील केदार हे माण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रा. बाबर यांनी माण तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील सोयी-सुविधांचा अभाव व अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे या बाबी निदर्शनास आणल्या. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माण तालुक्यांतर्गत दहिवडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद तसेच माण पंचायत समितीमधील पशुवैद्यकीय अधिकारी विस्ताराबरोबरच मोही आणि वडजल येथील अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याचे निदर्शनाला आणून दिले. म्हसवड नगरपालिकेंतर्गत विरकरवाडी येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर असला, तरी प्रत्यक्षात कार्यान्वित नसल्याने पशुपालकांची गैरसोय होत आहे. माण तालुक्यात जनावरांच्या प्रमाणात पशुवैद्यकीय दवाखान्यांची वाढीव गरज असल्याचे सांगून पूर्वीचे प्रस्तावित पशुवैद्यकीय दवाखाने मंजूर करावेत. तसेच तालुक्यातील पशुपालकांची गरज लक्षात घेऊन जास्तीत जास्त सोयी-सुविधा पुरविण्याची ग्वाही मंत्री केदार यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्ष एम. के. भोसले उपस्थित होते. याबाबतचे निवेदन मंत्री केदार यांना देण्यात आले. या निवेदनावर नगरसेवक विकास गोंजारी, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष अनिल लोखंडे, युवक जिल्हा सरचिटणीस नीलेश काटे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Demand to the Animal Husbandry Minister to fill the vacancies in Maan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.