नराधम मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:38 IST2021-03-10T04:38:30+5:302021-03-10T04:38:30+5:30

सातारा : महाबळेश्वर शहरातील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराची सखोल चौकशी करून संबंधित नराधमास कठोर शासन करावे, ...

Demand for action against Naradham headmaster | नराधम मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी

नराधम मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी

सातारा : महाबळेश्वर शहरातील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराची सखोल चौकशी करून संबंधित नराधमास कठोर शासन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्याध्यापकांनी केलेल्या कुकर्माने महाबळेश्वर शहर हादरले आहे. दिलीप रामचंद्र ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक असून त्याने जवळच्या नात्यातील दहावी इयत्तेत शिकत असलेल्या पंधरा वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोगशाळेत व हॉलमध्ये वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्या मुलीवर अत्याचार केला आहे. महिला दिनी ही बाब उघड झाली आहे. एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला अशा नराधमांना कडक शिक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे.

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, कुसूमताई भोसले, नलिनी जाधव, पूजा काळे, स्मिता देशमुख, अनघा कारखानीस, प्राची ताकतोडे, उषा पाटील, रशिदा शेख, जयश्री साळुंखे आदींनी हे निवेदन दिले आहे.

Web Title: Demand for action against Naradham headmaster