अपहाराच्या कारवाईत दिरंगाई : मार्डीत आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST2021-08-14T04:43:54+5:302021-08-14T04:43:54+5:30
पळशी : माण तालुक्यातील मार्डी येथे १४ व्या वित्त आयोगासंबंधी झालेल्या घोटाळ्याबाबत चंद्रकांत पोळ यांनी माहिती अधिकाराचा अवलंब करून ...

अपहाराच्या कारवाईत दिरंगाई : मार्डीत आत्मदहनाचा इशारा
पळशी : माण तालुक्यातील मार्डी येथे १४ व्या वित्त आयोगासंबंधी झालेल्या घोटाळ्याबाबत चंद्रकांत पोळ यांनी माहिती अधिकाराचा अवलंब करून अपहार झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणून दिले. अखेर अपहाराच्या चौकशीत दिरंगाई होत असल्याने चंद्रकांत पोळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजदिनी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन शासनदरबारी दिले आहे.
ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून काही वस्तू खरेदी केल्या आहेत, असे दाखवून बोगस बिले वापरून रकमेचा अपहार केला आहे, त्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे तत्कालीन सरपंच आणि सदस्य यांनी रकमेचा अपहार केला असून, प्रशासनाने ही बाब अनियमतता या सदराखाली घेऊन कारवाई सुरू असल्याचे सांगितले. मात्र, प्रशासनाने ही गंभीर बाब अनियमततेबरोबरच ‘अपहार’ या सदराखाली घालावी आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अपहार झालेली रक्कम वसूल करण्यात यावी व त्याप्रमाणे कारवाई करणार असल्याचे लेखी पत्र प्रशासनाने द्यावे; अन्यथा, १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.