शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

औंधच्या उपसरपंचपदी दिपक नलवडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:14 IST

खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची समजली जाणारी औंध ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत दिपक नलवडे यांची बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देसरपंच सोनाली मिठारी यांनी स्वीकारला पदभार गुलालाची उधळण करत ग्रामस्थांचा आनंदोत्सव

औंध : खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची समजली जाणारी औंध ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत दिपक नलवडे यांची बिनविरोध निवड झाली.औंध ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या महिन्यात झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखालील श्री यमाई विकास पॅनेलच्या सोनाली शैलेश मिठारी यांची अटीतटीच्या लढतीत लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली होती.उपसरपंच निवडीसाठी गुरुवार, दि. २५ रोजी सरपंच सोनाली मिठारी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्री यमाई विकास पनेलच्या दिपक नलवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपसरपंच पदाची निवडणूक पार पडताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी करून जल्लोष केला.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंधमध्ये केलेल्या विकासकामाच्या जोरावर श्री यमाई विकास पॅनेलने सरपंच पदासह नऊ जागा जिंकून ग्रामपंचायतीची निर्विवाद सत्ता हस्तगत केली. ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी राजकन्या चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी यांनी नेतृत्वाचा करीश्मा दाखवून विरोधी पॅनेलला पराभवाची धूळ चारली होती.

या निवडणुकीत जगदंबा परिवर्तन विकास पॅनेलने सहा जागा तर एक ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे उपसरपंचपदाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे सदस्य कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उपसरपंचपदाची निवडणूक न लढवता त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. निवडणूक निरीक्षक म्हणून मंडलाधिकारी प्रताप राऊत यांनी काम पाहिले.नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हणमंतराव शिंदे, माजी सरपंच नंदीनी इंगळे, सचिन शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आत्तार, वसंतराव माने, गणेश देशमुख, गणेश हरिदास, वाहीद मुल्ला, संदीप चव्हाण, भरतबुवा यादव, रमेश जगदाळे, इलियास पटवेकरी, बापूसाहेब कुंभार, युवराज रणदिवे, तुषार रणदिवे, सनातन रणदिवे, कुलदीप इंगळे, गणेश इंगळे, वामन पवार, महादेव जाधव, मंदार कुंभार, विक्रम शिंदे, विशाल ओतारी, शुभम इनामदार, शुभम शिंदे, श्रीपाद सुतार, रोहित मगर, विशाल भोसले यांनी कौतूक केले.

टॅग्स :sarpanchसरपंचSatara areaसातारा परिसरElectionनिवडणूक