रणसिंगवाडीतील दीपक मसुगडे हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:54+5:302021-01-23T04:40:54+5:30
पुसेगाव : पुसेगावसह आसपासच्या पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रणसिंगवाडी येथील कुख्यात गुंड दीपक नामदेव मसुगडे याला ...

रणसिंगवाडीतील दीपक मसुगडे हद्दपार
पुसेगाव : पुसेगावसह आसपासच्या पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रणसिंगवाडी येथील कुख्यात गुंड दीपक नामदेव मसुगडे याला एक वर्षासाठी माण, खटाव, कोरेगाव, सातारा या चार तालुक्यांतून हद्दपार केले आहे,’ अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.
रणसिंगवाडी येथील गुंड दीपक मसुगडे याच्यावर पुसेगाव, दहीवडी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. तीन वर्षांनंतर जामिनावर सुटताच हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार त्याला खटाव, माण, कोरेगाव, सातारा या चार तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. यापुढेही गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ५५ अंतर्गत कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घोडके यांनी सांगितले.