प्रस्ताव देण्यात दीपक चव्हाण शून्य

By Admin | Updated: July 24, 2014 22:30 IST2014-07-24T22:29:24+5:302014-07-24T22:30:57+5:30

स्थानिक विकास : संपूर्ण निधी खर्च करण्याचे सर्वच आमदारांपुढे आव्हान

Deepak Chavan Zero | प्रस्ताव देण्यात दीपक चव्हाण शून्य

प्रस्ताव देण्यात दीपक चव्हाण शून्य

सातारा : जिल्ह्यातील आमदारांनी या आर्थिक वर्षातील स्थानिक विकासनिधी विविध विकासकामांसाठी टाकण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी ती अजूनही संथगतीने सुरू आहे. आठपैकी तीन आमदारांचा यावर्षीचा निधी अजूनही काही कारणांमुळे मंजूर झालेला नाही, दोन आमदारांनी पंचवीस लाखांचा टप्पा ओलांडलेला नाही.फलटणचे आमदार प्रा. दीपक चव्हाण यांनी यावर्षी एकही काम मंजुरीसाठी अथवा अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पाठविलेले नाही.
जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी २०१३-१४ चा मंजूर निधी प्रत्येकी दोन कोटी रुपये विकासकामांवर खर्च केला असला तरी यावर्षीचा दोन कोटी रुपये निधी आचारसंहिता लागू होईपर्यंत विकासकामांवर टाकला जाणार की, तो अखर्चित राहणार, याकडेच नजरा आहेत. दरम्यान, कोणत्याही आमदारांचा निधी मागे राहू नये, यासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यालयात अनेकांची धावपळ सुरू आहे.
आॅगस्टच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सर्व निधी विकासकामांवर टाकणे बंधनकारक आहे. हा निधी पुढील वर्षभरात केव्हाही खर्च झाला तरी चालेल; मात्र त्याच्या खर्चाला यावर्षी मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
आमदारांसाठी प्रत्येकवर्षी विविध विकासकामांसाठी दोन कोटी निधी मिळतो. तो दरवर्षी स्थानिक विकासासाठी खर्च करावयाचा असतो. यामध्ये साकव पूल, मंदिर जीर्णोद्धार, सभामंडप त्याचबरोबर इतर दुरुस्तींच्या कामाचा समावेश आहे. ग्रामपंचायत, स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी या नुसार गावपातळीवर आमदार निधी टाकतात आणि ती कामे पूर्ण होतात. या कामांचे आराखडे, अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेची ग्रामीण विकास यंत्रणा त्याचबरोबर इतर घटक तयार करते. अनेकदा ही कामे स्थानिक मजूर सेवा सोसायटींच्या माध्यमातूनही केली जातात.
विलासराव पाटील-उंडाळकर, विक्रमसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील या आमदारांनी या आर्थिक वर्षात करावयाच्या कामांचे मंजुरीचे प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठविले आहेत. त्याची कार्यवाही पावसाळा सपंल्यानंतर होईल, असे सध्यातरी दिसते.
फलटणचे आमदार प्रा. दीपक चव्हाण यांनी यावर्षी एकही काम मंजुरीसाठी अथवा अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पाठविलेले नाही. माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांची अंदाजपत्रके तयार झाली असली तरी त्यांच्या काही कामांचे दाखले अजूनही नियोजन समितीला जिल्हा परिषदेतून मिळालेले नाहीत. वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या कामांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. (प्रतिनिधी)
कऱ्हाड दक्षिणविलासराव पाटील-उंडाळकर३७ लाख १.६३ कोटी
पाटण विक्रमसिंह पाटणकर २५.३३ लाख १.७४ कोटी
कोरेगाव शशिकांत शिंदे १३.८६ लाख १.८६ कोटी
फलटण प्रा. दीपक चव्हाण (काहीच नाही) २ कोटी
वाई मकरंद पाटील (मंजूर प्रक्रिया सुरू) २ कोटी
सातारा शिवेंद्रसिंहराजे भोसले १.०२ कोटी ९८ लाख
माण जयकुमार गोरे (अंदाजपत्रके तयार) २ कोटी
कऱ्हाड उत्तर बाळासाहेब पाटील ४९.९९ लाख १.५0 कोटी

Web Title: Deepak Chavan Zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.