वाई रोटरी क्लब अध्यक्षपदी दीपक बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:26 IST2021-07-10T04:26:51+5:302021-07-10T04:26:51+5:30

वाई : वाई रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दीपक बागडे व सचिवपदी डॉ. प्रेरणा ढोबळे यांची निवड करण्यात आली. ...

Deepak Bagde as Y Rotary Club President | वाई रोटरी क्लब अध्यक्षपदी दीपक बागडे

वाई रोटरी क्लब अध्यक्षपदी दीपक बागडे

वाई : वाई रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दीपक बागडे व सचिवपदी डॉ. प्रेरणा ढोबळे यांची निवड करण्यात आली.

रोटरी क्लबचे अध्यक्ष अजित क्षीरसागर व सचिव डॉ. जितेंद्र पाठक यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

निकडीची गरज व सामाजिक जबाबदारी ओळखून संपूर्ण जगाला हादरविणाऱ्या कोरोना या आजाराबाबत आलेल्या समस्यांचा निपटारा करण्यास आपल्या कार्यकालात प्राधान्य राहील. याशिवाय आरोग्य शिबिरे, पर्यावरण संवर्धन, शालाबाह्य मुलांचे शिक्षण, स्वयंपूर्ण खेडे निर्मितीअंतर्गत गावांचा एकात्मिक विकास साधणे, गावे अंधत्वमुक्त व साक्षर करणे आदी प्रकल्प रोटरीच्या माध्यमातून वर्षभरात राबविण्याचा मानस दीपक बागडे यांनी व्यक्त केला.

निवडीबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ, डॉ. शंतनू अभ्यंकर, अजित क्षीरसागर, प्रमोद शिंदे, डॉ. दत्तात्रय घोरपडे, सुनील शिंदे, डॉ. जितेंद्र पाठक, डॉ. सुनील देशपांडे, अनुपम गांधी, कुणाल शहा, नीला कुलकर्णी, मदन पोरे, पूरब शहा, संजीवनी कद्दू, डॉ. रुपाली अभ्यंकर, डॉ. महेश मेणबुदले, प्रशांत इनामदार, संतोष निकम, प्रमोद चव्हाण, संजीवनी वरखडे, अश्विनी बागडे आदींनी कौतुक केले.

Web Title: Deepak Bagde as Y Rotary Club President