शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 16:27 IST

पाणीपातळीत घट होत असली तरी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.

पेट्री : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असून पाणीपातळी खालावू लागली आहे. सद्य:स्थितीला तलावात साडेसतरा फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी डिसेंबरच्या अखेरीस अठरा फूट पाणीसाठा शिल्लक होता. परंतु यंदा नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे सध्या गतवर्षीपेक्षा दीड ते दोन फूट पाणीसाठा अधिक शिल्लक आहे.कास तलावात किनाऱ्यालगत पंचवीस फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. गतवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अठरा फूट पाणीसाठा शिल्लक होता. यंदा आजमितीला सध्या ही पाणी पातळी साडेसतरा फुटांवर आहे. सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दोन दिवसांला तलावातील पाणी पातळी एक ते दीड इंचाने कमी होत आहे. 

पाणीसाठा पावसाळ्यांपर्यंत टिकून राहावा, यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या कास तलावातील पहिला व्हॉल्व्ह गतवर्षी जानेवारी महिन्यात उघडा पडला होता. सद्य:स्थितीला तलावातील पाणीसाठा पाहता फेब्रुवारी महिन्यात तलावाचा पहिला व्हॉल्व्ह उघडा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा...एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या कास तलावातील पहिला व्हॉल्व्ह गतवर्षी जानेवारी महिन्यात उघडा पडला होता. साधारण एप्रिल अखेरीस ते मे महिन्याच्या सुरुवातीस दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडला जातो. दगड अथवा अन्य कोणतीही वस्तू अडकून पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी पालिकेने सर्वात खालच्या व्हॉल्व्हवर जाळी बसविलेली आहे.

सध्या कास तलावात साडेसतरा फूट पाणीसाठा शिल्लक असून यंदा नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे गतवर्षीपेक्षा दीड फूट पाणीसाठा जास्त प्रमाणात शिल्लक आहे. तरीदेखील नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. - जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी