सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST2021-09-04T04:45:40+5:302021-09-04T04:45:40+5:30
यंदा दहा सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गतवर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली नव्हती. ...

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली
यंदा दहा सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गतवर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली नव्हती. घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. कोरोनामुळे दोन वर्षांपासून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ गजबजून गेली आहे. हार, लाईटच्या माळा, इलेक्ट्रिक साहित्य, रंगीबेरंगी कागद, तयार मखर, सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी दुकानांमध्ये गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. कुंभारवाड्यात गणेशमूर्ती बनविण्याची लगबग चार महिन्यांपासून सुरू आहे. कारागीर मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे कारागीरांनी सांगितले.
फोटो : ०३केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडातील मूर्तिकार गणेशमूर्तींवर सध्या अखेरचा हात फिरवत आहेत.