काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चार-पाच दिवसांत निर्णय : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:56+5:302021-01-08T06:04:56+5:30

कऱ्हाडात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, अजित पाटील-चिखलीकर आदी उपस्थित ...

Decision regarding Congress state president post in four-five days: Chavan | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चार-पाच दिवसांत निर्णय : चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चार-पाच दिवसांत निर्णय : चव्हाण

कऱ्हाडात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, अजित पाटील-चिखलीकर आदी उपस्थित होते.

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मला विधानसभा सभापती पदाबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र, सक्रिय राजकारण आणि विधानसभा मतदारसंघाला जास्त वेळ देता आला नसता, याचा विचार करून आपण सभापतीपद नाकारले होते. एक नेता, एक पद याबाबत काँग्रेसमध्ये पूर्वीपासून विचार सुरू आहे. पक्षश्रेष्ठींच्या विचारानुसार आता याबाबत विचार सुरू झाला आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांनी याबाबत आमदारांची मते जाणून घेतली आहेत. त्यामुळे आता सुरू असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत ठोस निर्णय होईल की नाही, हे आपणास माहिती नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील आणि काही दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Decision regarding Congress state president post in four-five days: Chavan