कोरेगाव बाजार समितीचा आज फैसला

By Admin | Updated: August 18, 2015 22:34 IST2015-08-18T22:34:39+5:302015-08-18T22:34:39+5:30

निवडणूक : विक्रमी ९६ टक्के मतदान

The decision of the Koregaon Market Committee today | कोरेगाव बाजार समितीचा आज फैसला

कोरेगाव बाजार समितीचा आज फैसला

कोरेगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत ९५.९८ टक्के मतदान झाले. एकूण १४ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. दरम्यान, बुधवार दि. १९ रोजी सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे.पणन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजीराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे उर्वरित १८ जागांसाठी तब्बल १५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये ४४ अर्ज अवैध ठरविल्याने १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यपूर्ण घडामोडी घडत गेल्या आणि तब्बल ६५ जणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात केवळ ४४ जण राहिले होते.कोरेगाव, रहिमतपूर, कुमठे, किन्हई, देऊर व पिंपोडे बुद्रुक येथे मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ८ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली. सकाळी मतदानाला वेग होता, दुपारी मात्र तो मंदावला. शेवटच्या दोन तासात पुन्हा मतदानाने वेग घेतला. राष्ट्रवादीसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांशी संपर्क साधून मतदान करण्याबाबत विचारणा करत होते, त्यामुळे मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढली. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रीती काळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय काकडे, बाजार समितीचे
सचिव संताजी यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम व यशवंत ढगे यांनी प्रयत्न
केले. (प्रतिनिधी)..


२,६५३ मतदारांनी बजावला हक्क
विकास सोसायटी मतदारसंघात १११५ पैकी १०९४, ग्रामपंचायत मतदारसंघात १०६९ पैकी १००७, व्यापारी-आडते मतदारसंघात ५०६ पैकी ४७८, हमाल-तोलारी मतदारसंघात ७५ पैकी ७४ मतदान झाले. एकूण २७६५ पैकी २६५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: The decision of the Koregaon Market Committee today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.