शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वाघोलीचे सरपंच बशीरखान पठाण अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 17:31 IST

वाघोली, ता. कोरेगाव येथे २६ जानेवारी २०१८ ची ग्रामसभा सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी कायद्यातील तरतुदीनुसार घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुमार भोईटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यापुढे होऊन सरपंच बशीरखान पठाण यांना अपात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्देवाघोलीचे सरपंच बशीरखान पठाण अपात्र जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय २६ जानेवारीची सभा घेतली नसल्याने प्रकरण भोवले

पिंपोडे बुद्रुक : वाघोली, ता. कोरेगाव येथे २६ जानेवारी २०१८ ची ग्रामसभा सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी कायद्यातील तरतुदीनुसार घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुमार भोईटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यापुढे होऊन सरपंच बशीरखान पठाण यांना अपात्र ठरविण्यात आले.सरपंच यांच्या म्हणण्यानुसार २६ जानेवारीची ग्रामसभा आम्ही २३ जानेवारीला घेतली होती; पण कोरमअभावी सभा तहकूब झाल्यामुळे ही ग्रामसभा आम्ही ३० जानेवारी रोजी घेतली होती. तक्रारदार कुमार भोईटे यांच्या म्हणण्यानुसार २६ जानेवारी रोजीची ग्रामसभा हे कायद्याने बंधनकारक आहे व ती सभा न घेतल्यास सरपंचांवर कारवाई करण्यात येते.वाघोली गावच्या सरपंचांनी २६ जानेवारीच्या ग्रामसभेबाबत कोणत्याही प्रकारची गांभीर्य न दाखवता आपल्या सोयीनुसार ग्रामसभा घेतली, असे दाखवले; परंतु वास्तविक पाहता २६ जानेवारी रोजी वाघोली गावामध्ये ग्रामसभा मागणी असूनही घेण्यात आली नाही.ज्या दिवशी घटना अस्तित्वात आली, त्याच दिवशी एक प्रकारे घटनाच असणाऱ्या ग्रामपंचायत अधिनियमाची अवहेलना जर सरपंचांकडून होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे भोईटे यांनी नमूद केले होते. जिल्हाधिकारी यांनी याविषयी निकाल देऊन २६ जानेवारीच्या ग्रामसभेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.२६ जानेवारी २०१८ रोजीची ग्रामसभा ग्रामसेवकांचा संप असल्याचे कारण सांगून घेण्याचे टाळण्यात आले होते, वास्तविक प्रशासनाने जरी ग्रामसेवकांचा संप असला तरीही २६ जानेवारीची ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक असल्यामुळे सरपंचांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक किंवा शासकीय कर्मचारी यांची सचिव म्हणून नियुक्ती करून ही ग्रामसभा घेऊन त्याचा अहवाल जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.कायद्यानुसार ग्रामसेवक उपस्थित नसेल तर सचिव म्हणून सरपंचांना इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत. या अर्जाची सुनावणी होऊन यामध्ये सरपंच पठाण यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम क्रमांक १९५८ कलम ७ चा भंग केला म्हणून जिल्हाधिकारी त्यांना अपात्र करण्यात आल्याचा निर्णय दिला.

टॅग्स :sarpanchसरपंचCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर