शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आठ नगरसेवकांना अपात्र ठरवा

By admin | Updated: January 6, 2015 00:48 IST

महाबळेश्वर पालिका : डी. एम. बावळेकर यांची मागणी

महाबळेश्वर : ‘पालिकेत सत्तेवर असलेल्या महाबळेश्वर विकास आघाडीच्या आठ नगरसेवकांनी पक्षांतर बंदी कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे,’ अशी मागणी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी केली आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाबळेश्वर पालिकेच्या २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार प्रभागांतून सतरा नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये लोकमित्र जनसेवा आघाडीचे आठ तर नऊ नगरसेवक अपक्ष निवडून आले. अपक्ष नगरसेवकांपैकी आठ जणांनी एकत्र येऊन महाबळेश्वर विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीची सभा घेऊन त्यांनी पक्षनेता, उपनेता, पक्षप्रतोद यांची निवड केली. तसेच आघाडीची घटनाही तयार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आघाडीला कायदेशीर मान्यताही दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातील नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, नगरसेवक कुमार शिंदे, संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, संगीता वाडकर, सुरेखा आखाडे, लीला मानकुमरे, विमल पार्टे आघाडीचे म्हणजेच, एका नवीन पक्षाचे अधिकृत सदस्य झाले. त्यामुळे अंतर्गत निवडणुकीत आघाडीतर्फे निवडणूक लढविणे आवश्यक आहे. मात्र २०१२-१३ मध्ये झालेल्या विषय समित्यांच्या सदस्य व सभापती निवडणुकीत आठही नगरसेवकांनी आघाडीतर्फे न लढवता अपक्ष नगरसेवक म्हणून लढविली आहे. २०१२ मध्ये आठही नगरसेवकांनी नंदकिशोर भांगडिया यांना नामनिर्देशित नगरसेवक म्हणून नियुक्त केले. त्यांच्या नामनिर्देशन पत्रात आठही नगरसेवकांनी ‘अपक्ष सदस्यांचा एकत्रित गट’ म्हणून नमूद केले. त्याचप्रमाणे गटनेतेपदी निवड करताना दिलेले लेखी पत्रात स्वत:चा उल्लेख अपक्ष सदस्य असाच केला आहे. जुलै २०१४ मध्ये विविध विषय समित्यांच्या सभापतिपदाचे उमेदवारी अर्ज सर्व नगरसेवकांनी अपक्ष नगरसेवक ‘अपक्ष गट’ असा स्वत:चा उल्लेख करून महाबळेश्वर विकास आघाडीचे अस्तित्व लपविले. आठही नगरसेवकांनी सर्व निवडणुका अपक्ष नगरसेवक असल्याप्रमाणे लढविल्या; परंतु १६ डिसेंबरला झालेल्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रात सर्व नगरसेवकांनी ‘महाबळेश्वर विकास आघाडीचे सदस्य’ असा उल्लेख केला व प्रथमच आघाडीतर्फे निवडणूक लढविली. त्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापती निवडणुकीत मात्र या नगरसेवकांनी ‘अपक्ष’ म्हणून उमेदवारी अर्ज सादर केले. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षांतर बंदी कायद्याचा भंग झाला आहे. त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी बावळेकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)पाचगणीची पुनरावृत्तीपाचगणी पालिकेतील अपक्ष नगरसेवकांनी निवडणुकीनंतर याचपद्धतीने लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली पाचगणी विकास आघाडीची स्थापना केली होती. आघाडीतील सुलभा लोखंडे यांनीही आघाडीचे सदस्यत्व स्वईच्छेने सोडल्याने त्यांनाही नगरसेवकपद गमवावे लागले होते. त्यामुळे महाबळेश्वरमधील आठ जणांवर कारवाई होईल, असा विश्वास बावळेकर यांनी व्यक्त केला.