शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका

By नितीन काळेल | Updated: April 25, 2023 11:26 IST

कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा

सातारा : साखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊसतोड कामगारांसाठी मुकादमांना उचल देऊनही टोळ्या न देता परस्पर पैसे लाटण्याच्या घटना दोन वर्षात वाढल्या असून, जिल्ह्यात अशी १ हजार २०० प्रकरणे समोर आली आहेत. या माध्यमातून मुकादमांनी वाहतूकदारांना सुमारे ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालंय तर दुसरीकडे उसाला कोयता लावण्यासाठी टोळ्या लूट करत आहेत.राज्याचा डोलारा कृषी आणि सहकारावर उभा आहे. साखर कारखान्यामुळे तर अनेक कुटुंबांना आधार मिळालाय. या माध्यमातून वर्षातील सहा महिने तरी अनेक कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळतोय. पण, यामध्येही आता अनिष्ट गोष्टी घडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांची लूट होत आहे. तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना फसविण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा गंडा गरीब वाहनधारकांना बसलाय. सातारा जिल्ह्यात हा आकडा सतत वाढतच चालला आहे.काही वर्षांपूर्वीपर्यंत साखर कारखाने करार करून ऊसतोडणी कामगार आणत असत. यासाठी मुकादम ही व्यवस्था होतीच. यामध्ये मुकादमांना उचल देणे, ने-आणण्याची जबाबदारी कारखाना प्रशासन पाहत होते. पण, गेल्या काही वर्षांत कारखान्यांनी ही जबाबदारी ढकलली आहे. आता कारखाना प्रशासन वाहनधारकांशी करार करते. त्यासाठी कारखान्याकडून वाहनधारकांना रक्कम देण्यात येते. यातून वाहनधारकाने मुकादमाला भेटून ऊस तोडणीसाठी टोळ्यांची जबाबदारी घ्यायची. त्यासाठी टोळ्यांना पैसेही देण्यात येत आहेत.म्हणजे वाहनधारकच पैसे देण्यापासून टोळ्या आणणे-नेण्याची जबाबदारी घेत आहेत. पण, आगाऊ उचल घेऊनही टोळ्या येत नाहीत. तसेच काहीवेळा टोळ्या आल्या तरी काही दिवस काम करतात आणि परत पळून जातात. यामुळे वाहनधारकांनाच याचा फटका बसत आहे. कारण, कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा बसतो.सातारा जिल्ह्यात मागील दोन वर्षात टोळ्यांनी फसविल्याची सुमारे १ हजार २०० प्रकरणे घडली आहेत. या टोळ्यांनी वाहनधारकांना ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारक रस्त्यावर आले आहेत. कारखान्याशी करार करणारे वाहनधारक हे गरीब व सामान्य कुटुंबातील आहेत. कर्ज घेऊन वाहन खरेदी आणि हप्ते भरून नाकीनऊ आले असताना या टोळ्या व मुकादमांकडून गंडा घातला जात आहे. त्यामुळे या वाहनधारकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विडा उचलला आहे. आता शासन दरबारी यावर काही मार्ग निघणार का, हाच आता प्रश्न आहे.दरम्यान, टोळ्या तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना गंडा घातला जातो. तसेच ऊसतोड मजूर हे उसाला कोयता लावण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून पैसे घेतात. एक एकर ऊसतोडीसाठी ५ ते १० हजार रुपये घेतले जातात. यातून शेतकऱ्यांना लुटण्याचाच प्रकार होतो. हे दुष्टचक्र काेणीही थांबवत नाही.टोळीची स्थिती...

  • एक टोळीत ५ ते १० जोड्या असतात. त्यापेक्षाही अधिक असू शकतात.
  • एक टोळी हंगामासाठी ५ ते १० लाख रुपये घेते.
  • टोळीसाठी मुकादमाचा रोल महत्त्वाचा.
  • एक टोळी दिवसाला क्षमतेनुसार अर्धा ते एक एकर क्षेत्रातील ऊसतोडणी करते.
  • कारखान्याच्या क्रशिंग क्षमतेवर टोळ्या ठरतात. साधारणपणे एका कारखान्यासाठी २५० ते ३०० टोळ्या हंगामात लागतात.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेfraudधोकेबाजीFarmerशेतकरी