मैत्रिणीकडे केक घेऊन निघालेल्या तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST2021-01-03T04:37:22+5:302021-01-03T04:37:22+5:30

फलटण : फलटण-पंढरपूर मार्गावर फलटण येथील महाविद्यालयीन तरुणीचा विडणी हद्दीत अपघाती मृत्यू झाला. घरी वाढदिवस साजरा करून केक ...

The death of a young woman who took a cake to her friend | मैत्रिणीकडे केक घेऊन निघालेल्या तरुणीचा मृत्यू

मैत्रिणीकडे केक घेऊन निघालेल्या तरुणीचा मृत्यू

फलटण : फलटण-पंढरपूर मार्गावर फलटण येथील महाविद्यालयीन तरुणीचा विडणी हद्दीत अपघाती मृत्यू झाला. घरी वाढदिवस साजरा करून केक घेऊन मैत्रिणीकडे जात असतानाच तिच्यावर काळाने घाला घातला. पर्णवी तथा जान्हवी संजय काकडे (वय २१, मंगळवार पेठ, फलटण) असे मृत तरुणीचे नाव आहे.

फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्णवी ऊर्फ जान्हवी संजय काकडे ही तरुणी शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास फलटणहून विडणीकडे आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या मैत्रिणीकडे दुचाकीवरून जात होती. ती विडणी हद्दीतील कोकरेवस्ती येथे आली असता, भरधाव आलेली ट्रॅक्टर-ट्रॉली (एमएच ४५ एस ३३७२) तिच्या दुचाकीला ओव्हरटेक करत असताना मागील ट्रॉलीची धडक दुचाकीला बसली. यामध्ये जान्हवी गंभीर जखमी झाली. जान्हवीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. या अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.

जान्हवी काकडे हिने एम.एस्सी. ॲग्रीची पदवी घेतली होती. तिने बी.एस्सी. ॲग्री फलटणच्या शेती महाविद्यालयात, तर एम.एस्सी. पदवीचे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले होते. सध्या ती युपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. जान्हवीने ३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा केला होता. दुपारपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. परंतु वाढदिवसादिवशीच तिचा मृत्यू झाल्याने, जान्हवीस श्रध्दांजली वाहण्याची दुर्दैवी वेळ नातलग व मित्रपरिवारावर तसेच शुभेच्छांचा वर्षाव केलेल्यांवर आली.

आयकार्ड फोटो

०१जान्हवी काकडे

Web Title: The death of a young woman who took a cake to her friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.