पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:58 IST2021-02-23T04:58:19+5:302021-02-23T04:58:19+5:30

पुसेसावळी : पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या चोवीस तासांतच पत्नीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील गोरेगाव ...

The death of the wife after the death of the husband | पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचाही मृत्यू

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचाही मृत्यू

पुसेसावळी : पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या चोवीस तासांतच पत्नीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

गोरेगाव वांगी येथील निवृत्त फौजी हिंदूराव बाळू शिंदे (८२) यांचे अल्प आजाराने निधन झाले होते. त्यांनी सैन्यदलात अठरा वर्षे सेवा बजावली होती. आजी-माजी सैनिक संघटनेचे ते सदस्य होते. त्याचबरोबर सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या चोवीस तासांत त्यांच्या पत्नी मालन हिंदूराव शिंदे यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोरेगाव वांगी ग्रामस्थांतून शोककळा पसरली आहे.

फोटो-

२२हिंदूराव शिंदे

२२मालन शिंदे

Web Title: The death of the wife after the death of the husband