शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: पैशासाठी नव्हं तर, दारुसाठी दिली जीवे मारण्याची धमकी; साताऱ्यात चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:32 IST

आम्हाला पैसे नको पण तू आम्हाला दारू दिली पाहिजेस अन्यथा तुला आणि तुझ्या बार मालकाला जीवे ठार मारू, अशा प्रकारची धमकी दिली.

सातारा : अनेकदा आपण पैशासाठी खंडणी मागणारे अनेकजण पाहिले असतील पण दारूसाठी कोणी खंडणी मागितलेली एेकिवात नाही.  पण साताऱ्यात मात्र, दारूसाठी खंडणीची मागणी केल्याचे समोर आलय. आम्हाला पैसे नको पण तू आम्हाला दारू दिली पाहिजेस अन्यथा तुला आणि तुझ्या बार मालकाला जीवे ठार मारू, अशा प्रकारची धमकी मद्धपींनी दिली.यानंतर हाॅटेल मालकाने तक्रार दिल्यानंतर संबंधित मद्धपींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाबा ओव्हाळ, बंटी गायकवाड, तन्वीर शेख व अन्य अनोळखी व्यक्ती (सर्व रा. प्रतापसिंह नगर, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष रामदास मिरगे (वय ३५, रा. कोडोली, सातारा) यांचे विसावा नाक्यावर हाॅटेल आस्वाद परमिट रुम व बिअर बार आहे. या बारमध्ये वरील चाैघांनी एके दिवशी येऊन दारू ढोसली. मात्र, त्याचे पैसे दिले नाहीत. मात्र, हे चाैघेजण काल, बुधवारी पुन्हा बारमध्ये आले. यावेळी पहिले बिल दिले नसल्याने मिरगे यांचा आत्तेभाऊ मदन शिंदे याने त्यांना दारू देण्यास नकार दिला.त्यामुळे या चाैघांनी चिडून त्याला धमकी दिली. तू आम्हाला दारू दिली नाहीस तर तुला व तुझा मालक संतोष मिरगे यांना ठार मारेन. तसेच तोडफोडही करेन, अशी तंबी दिली. एवढेच नव्हे तर तंबी देऊन घेतलेल्या २४५ रुपयांचे दारूचे बिल न देताच तेथून ते निघून गेले. या प्रकारानंतर बार मालक मिरगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी