महाबळेश्वरच्या धबधब्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: November 30, 2014 00:32 IST2014-11-30T00:29:37+5:302014-11-30T00:32:26+5:30
महाबळेश्वर : शहराजवळील प्रसिद्ध लिंगमळा धबधब्यावर कॅम्पसाठी आलेल्या पाचगणीच्या शाळेतील

महाबळेश्वरच्या धबधब्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
महाबळेश्वर : शहराजवळील प्रसिद्ध लिंगमळा धबधब्यावर कॅम्पसाठी आलेल्या पाचगणीच्या शाळेतील विद्यार्थ्याचा डोहातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. आबुबखर आसिफ खत्री (वय १७, मूळ रा. भोपाळ, मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे. तो अकरावीत शिकत होता.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील ग्रीन व्हॅली हायस्कूलमधील नववी ते बारावी या वर्गातील १७ विद्यार्थी व शिक्षक महाबळेश्वर येथे कॅम्पसाठी आले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास लिंगमळा येथील डोहामध्ये आबुबखर खत्री हा पोहण्यासाठी उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो आत ओढला गेला. मित्राने त्याला वाचविण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. डोहात विद्यार्थी बुडाल्याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली. वनविभाग, पोलीस व महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी अर्ध्या तासात आबुबखरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. दरम्यान, येथील डोहामध्ये पोहण्यासाठी अनेकजण येतात. येथे वनखात्याने ‘पोहण्यास सक्त मनाई’ असा फलक लावण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)