कास पठारावर रान गव्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 03:46 PM2020-03-25T15:46:15+5:302020-03-25T15:46:32+5:30

सातारा -  सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता म्हणुन कास पठाराची ओळख आहे. या कास पठारावर ...

The death of a ran gava in the Kas | कास पठारावर रान गव्याचा मृत्यू

कास पठारावर रान गव्याचा मृत्यू

googlenewsNext

सातारा -  सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता म्हणुन कास पठाराची ओळख आहे. या कास पठारावर बिबटया, अस्वल, रानडुक्कर,सायाळ, रानगव्या सारख्या अनेक वन्य पशुंचा वावर असतो.

आज सकाळी सात वाजता  या कास पठारावर एक रानगवा मृत्युमुखी पडल्याचे कास पठार कार्यकारी समितीच्या सुरक्षा रक्षकांना दिसले. ही घटना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून कळविण्यात आली.

दरम्यान, तेथे त्या मृत्युमुखी पडलेल्या रानगव्याचे उभे असणारे  पिल्लू काही कालावधीनंतर  झुडपात निघुन गेले. या रानगव्याचा मृत्यु सर्पदंशाने झाला असावा असे बोलले जात आहे. कारण यापुर्वी येथील परिसरात सापाचे वारंवार दर्शन झाल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला जाणार आहे.

Web Title: The death of a ran gava in the Kas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.