चाफळमध्ये चालत निघालेल्या व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST2021-09-09T04:47:05+5:302021-09-09T04:47:05+5:30

चाफळ : रस्त्यावरून चालत जात असताना छातीत दुखू लागल्याने जमिनीवर कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी पाचच्यादरम्यान चाफळ ...

Death of a person walking in Chafal | चाफळमध्ये चालत निघालेल्या व्यक्तीचा मृत्यू

चाफळमध्ये चालत निघालेल्या व्यक्तीचा मृत्यू

चाफळ : रस्त्यावरून चालत जात असताना छातीत दुखू लागल्याने जमिनीवर कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी पाचच्यादरम्यान चाफळ येथील पोलीस दूरक्षेत्रानजीक ही घटना घडली. तानाजी बाबूराव डांगे (रा. दाढोली, वय ५६) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तानाजी डांगे यांची मुलगी उंब्रज येथे राहते. तानाजी हे बऱेच दिवस उंब्रज येथे मुलीजवळ राहत होते. बुधवारी चारच्यादरम्यान तानाजी डांगे दाढोली येथील आपल्या घरी जायला निघाले होते. उंब्रज ते चाफळपर्यंत खासगी गाडीतून सुखरूप प्रवास केल्यानंतर तानाजी डांगे चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या पाठीमागे खासगी वडाप गाडीतून दाढोलीला जाण्यासाठी पाई चालत निघाले होते. चाफळ येथील पोलीस दूरक्षेत्राजवळून चालत जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले व ते जमिनीवर कोसळले. काही लोकांनी डांगे जमिनीवर कोसळल्याचे पाहून धाव घेतली. त्यांची विचारपूस केली. त्यानंतर ते अचानक गप्प झाले. याबाबत ग्रामस्थांनी त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर दाढोलीचे पोलीसपाटील सचिन डांगे व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डांगे यांना चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांनी सांगितले.

मृत डांगे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Death of a person walking in Chafal