शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोरोनाने मित्र हिरावला... मित्रांनी त्याचा संसार सावरला!, कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी दिली गिरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:08 IST

संभाजी हिंगणेच्या १९९२ च्या दहावी बॅचचे मित्र धावून आले. ‘१९९२ बॅचची आठवण मैत्रीची’ या नावाने एक ग्रुप कार्यरत आहे. त्यावर सर्वांना मदत करण्यास सांगितले. बघता बघता ५० हजार रुपयेचा निधी गोळा झाला. परंतु नुसते पैसे देऊन त्यांचा आयुष्यभराचा पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नव्हता. म्हणून या ग्रुपने त्यांना मासिक कमाई व्हावी या दृष्टीने एक पिठाची गिरणी देण्याचा मानस केला.

पांडुरंग भिलारेवाई : कोरोनाने जगाला भरपूर काही गमवायला भाग पाडले. अशीच घटना वाईमध्ये घडली. सुतार काम करणारे संभाजी हिंगणे व त्यांचे धाकटे बंधू तानाजी हिंगणे यांच्यावर नियतीचा घाला घातला. आई-वडील, संभाजी व तानाजी त्यांच्या पत्नी, दोघांनाही दोन-दोन मुले असे एकूण दहा माणसांचे एकत्र कुटुंब. कर्ती माणसं गेल्याने कुटुंबावर संकट कोसळले. या कुटुंबाला दहावीतील मित्रांनी मदतीचा हात देऊन  सावरण्यासाठी आधार दिला.

एक वर्षापूर्वी हे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकले. १६ मे २०२१ रोजी तानाजी हिंगणे याला कोरोनाने गाठले. बरेच उपचार घेऊनही तो घरच्यांच्या हाती लागला नाही. हे होत असतानाच मोठा भाऊ संभाजी हिंगणे हाही कोरोनाच्या विळख्यात अडकला. त्याच्यावरही बरेच उपचार केले. परंतु शेवटी त्यानेही अगदी एकाच आठवड्यात २६ मे २०२१ रोजी सर्वांना सोडून जगाचा निरोप घेतला. दोघांच्याही दवाखान्यासाठी घरात होता नव्हता तो पैसा गेला आणि उघडे पडले ते अख्खे कुटुंब.

अशावेळी संभाजी हिंगणेच्या १९९२ च्या दहावी बॅचचे मित्र धावून आले. ‘१९९२ बॅचची आठवण मैत्रीची’ या नावाने एक ग्रुप कार्यरत आहे. गेट-टुगेदर करता-करता बरेचसे सामाजिक उपक्रम करण्यात यांचा खारीचा वाटा असतो. संभाजी व त्याच्या घरच्यांबद्दल माहिती मित्रांना समजली तेव्हा त्यांनी मदतीचा हात म्हणून लगेच एक झूम मीटिंग आयोजित केली. त्यावर सर्वांना मदत करण्यास सांगितले. बघता बघता ५० हजार रुपयेचा निधी गोळा झाला. हे सर्व पैसे संभाजीच्या कुटुंबाला देण्यासाठी जमा झाले. परंतु नुसते पैसे देऊन त्यांचा आयुष्यभराचा पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नव्हता. म्हणून या ग्रुपने त्यांना मासिक कमाई व्हावी या दृष्टीने एक पिठाची गिरणी देण्याचा मानस केला.

दोन महिन्यांतच त्यांच्या घरच्यांना पिठाची गिरणी उपलब्ध करून त्याचे पूर्ण काम करून बसवून दिली. राहिलेले तीस हजार रुपये काही अनपेक्षित अडचणी दिसल्यामुळे थांबवण्यात आले. परंतु सर्व स्थिरस्थावर झाल्यावर ते २५ मे रोजी त्यांच्या आईच्या व पत्नीच्या नावे फिक्स डिपॉझिट स्वरूपामध्ये त्यांना देण्यात आले.

विधवा स्त्रियांना शिलाई मशीन

एक संघटन काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण आज यांच्या एकजुटीमुळे यांनी समाजाला दाखवून आदर्श निर्माण केला. मध्यंतरी याच ग्रुपने रोटरी क्लब ऑफ वाईबरोबर काम केले. कोरोना काळामध्ये गेलेल्या पुरुषांच्या विधवा स्त्रियांना सहा शिलाई मशीनचे वाटप करून उल्लेखनीय काम केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या