शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर नाक्यावर क्षणाक्षणाला घोंगावतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 17:36 IST

Accident Highway Satara: पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गाच्या अवजड वाहतूकीसह शहरातील वाहतूक एकाच जागेवरून येजा करत असल्यामूळे या ठिकाणी क्षणाक्षणाला मृत्यू डोक्यावर घोंगावत आहे. याठिकाणी दिवसातून किमान एक दोन लहान मोठे अपघात घडत असतात.

ठळक मुद्देअपघाताची मालिका सुरूच आंब्याचा ट्रक उलटलाउड्डाणपूलाच्या प्रतिक्षेत किती जाणार बळी

मलकापूर : पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गाच्या अवजड वाहतूकीसह शहरातील वाहतूक एकाच जागेवरून येजा करत असल्यामूळे या ठिकाणी क्षणाक्षणाला मृत्यू डोक्यावर घोंगावत आहे. याठिकाणी दिवसातून किमान एक दोन लहान मोठे अपघात घडत असतात. उड्डाणपूल रखडल्याने आत्तापर्यंत झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत तर काहींना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी पहाटे आंब्याचा ट्रक उलटल्याने पुन्हा एकदा हे अधोरेखीत होत आहे.कराड शहराचे प्रवेशव्दार म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी कराडसह मलकापूरमध्ये तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील अवजड वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी गर्दीतून मार्ग काढत महामार्गावरून कराडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेवूनच प्रवेश करावा लागतो.

कोल्हापूरडून पुणे बाजूकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर उड्डाणपूल नसल्यामुळे कराड शहरात येणारी वाहने व पुढे सातारा तसेच पुणे, मुंबईकडे जाणारी वाहने एकाच लेनवरून धावत असतात. महामार्गावर सातारा, पुणे बाजूकडे जाणारी वाहने भरधाव वेगात असतात. तर शहरात येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला असतो. आशा परिस्थितीत अनेकवेळा अपघात घडले आहेत. अशा अपघातात महामार्ग चौपदरीकरणानंतर आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कांही महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात आठ वर्षाच्या बालिकेला जिव गमवावा लागाला होता. तर काले येथील वृद्ध दांपत्य जागिच ठार झाले. आशा जीवघेण्या अपघातांसह सोमवारी आंब्याचा ट्रक उलटी होऊन झालेल्या अपघातासारखे छोटे मोठे आपघात नेहमीच घडतात. सुदैवाने या आपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. यापूढेही उड्डाणपूलाच्या प्रतिक्षेत आनखी किती जणांना जीव गमवावा लागेल असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग