दहावीच्या विद्यार्थीनीचा अपघातात मृत्यू
By Admin | Updated: June 12, 2016 00:47 IST2016-06-12T00:47:02+5:302016-06-12T00:47:02+5:30
फलटण : शिकवणी संपवून गावी जाताना दुर्घटना

दहावीच्या विद्यार्थीनीचा अपघातात मृत्यू
फलटण : फलटण येथे दहावीची शिकवणी संपवून विडणी येथे घरी निघालेल्या तरुणीचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. शिवानी संजय बुरुंगले असे मृत्युमुखी तरुणीचे नाव आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विडणी येथील शिवानी बुरुंगले (वय १६) ही दहावीला शिकत होती. शिवानी शिकवणीसाठी विडणीहून फलटणला सायकलवरून आली होती. शिकवणी संपवून शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ती घरी निघाली होती.
फलटण येथील नाना पाटील चौकात आली असता समोरून आलेला टँकर (एमएच १३ जी २०६६) याच्या पुढच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती भीमदेव बुरुंगले यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. टँकर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)