कारच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

By Admin | Updated: June 4, 2014 00:11 IST2014-06-04T00:09:54+5:302014-06-04T00:11:44+5:30

एक जखमी : पसरणी घाटात अपघात

Death of a car by a car | कारच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

कारच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

वाई : वाईहून पाचगणीकडे जाताना घाटात दुचाकीला कारने धडक दिली. यामध्ये दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. एकजण जखमी आहे. वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास भिकू पार्टे (वय ४५), संगीता विश्वास पार्टे (३७), सुषमा अशोक पार्टे (३३, सर्व रा. तायघाट, ता. महाबळेश्वर) हे काल, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकी (एमएच ११ बीएम ८३०७)वरून वाईहून पाचगणीमार्गे तायघाट या त्यांच्या गावी निघाले होते. त्यांची गाडी पसरणी घाटातील रेशीम केंद्राजवळ आली असता पाचगणीहून येत असलेल्या कार (एमएच ११ बीएच १०२८)ने दुचाकीला धडक दिली. यामध्ये विश्वास व संगीता पार्टे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुषमा पार्टे या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर वाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक महेश आनंदराव धनावडे (रा. विराटनगर, वाई) याच्याविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रमेश गलांडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Death of a car by a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.