साठ कोंबड्यांच्या मृत्यूने पशुपालक हादरले! प्रतीक्षा अहवालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:38 PM2021-01-16T12:38:24+5:302021-01-16T12:39:53+5:30

Bird Flu Satara- खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने पन्नास ते साठ कोंबड्या दगावल्याने पशुपालक हादरले आहेत. यामुळे पशु वैद्यकिय विभाग सतर्क झाला असून कोंबड्यांना नक्की कोणता आजार झाला होता याचा अभ्यास करण्यासाठी मृत कोंबड्या व कावळ्याचे नमुने पुण्यातील विभागीय प्रयोग शाळेला पाठविले आहेत. या अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे.

The death of 60 hens shocked the herdsmen! Awaiting report | साठ कोंबड्यांच्या मृत्यूने पशुपालक हादरले! प्रतीक्षा अहवालाची

साठ कोंबड्यांच्या मृत्यूने पशुपालक हादरले! प्रतीक्षा अहवालाची

Next
ठळक मुद्दे साठ कोंबड्यांच्या मृत्यूने पशुपालक हादरले! प्रतीक्षा अहवालाची मरिआईचीवाडीतील मृत कोंबड्या अन् कावळ्याचे नमुने घेतले

लोणंद : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने पन्नास ते साठ कोंबड्या दगावल्याने पशुपालक हादरले आहेत. यामुळे पशु वैद्यकिय विभाग सतर्क झाला असून कोंबड्यांना नक्की कोणता आजार झाला होता याचा अभ्यास करण्यासाठी मृत कोंबड्या व कावळ्याचे नमुने पुण्यातील विभागीय प्रयोग शाळेला पाठविले आहेत. या अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे.

मरिआईचीवाडी परिसरात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये यासाठी मृत सापडलेल्या कोंबड्याच्या परिसरात सोडियम हायफोक्लोराईची फवारणी करण्यात आली.

परिसरातील पोल्ट्री फार्मची पाहणी करुन मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर ज्यांनी कुकूटपालनाचा व्यवसाय केला आहे. त्या ठिकाणच्या पक्षांच्या रक्तांचे नमुने घेण्याचे काम लोणंद येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर मुळे, डॉ. दयाराम सूर्यवंशी, डॉ. पवण सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सुरू होते. यावेळी सर्व पोल्ट्रीधारकांना स्वच्छतेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.

पशुपक्षी वाहतुकीस बंदी

प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणास वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. याबाबतची अंमल बजावनी करण्यात येत आहे.
 

 

Web Title: The death of 60 hens shocked the herdsmen! Awaiting report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.