शीतलहरीमुळे दिवसाही गारठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:47+5:302021-02-06T05:15:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून थंडी वाढली असून, सातारा शहराचा पाराही घसरला आहे. शुक्रवारी किमान तापमान ...

Daytime frost due to cold wave! | शीतलहरीमुळे दिवसाही गारठा !

शीतलहरीमुळे दिवसाही गारठा !

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून थंडी वाढली असून, सातारा शहराचा पाराही घसरला आहे. शुक्रवारी किमान तापमान १३ अंशांवर होते. दरम्यान, शीतलहरीमुळे दिवसाही चांगलाच गारठा जाणवत आहे. त्यामुळे बाजारपेठेवरही परिणाम होऊ लागलाय.

जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर थंडीला सुरूवात झाली. हळूहळू थंडी वाढू लागली. दिवाळीच्या दरम्यान किमान तापमान १२ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे गारठा चांगलाच वाढला होता. मात्र, त्यानंतर थंडी गायब झाली होती. किमान तापमान २१ अंशांवरही गेल्यामुळे उकाडाही जाणवत होता. त्यानंतरही थंडीच्या प्रमाणात सतत चढ-उतार सुरू होता. असे असलेतरी डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशांखाली आलेले, तर सातारा शहरात ९ अंश तापमानाची नोंद झाली होती. दोन वर्षांतील हे नीचांकी तापमान ठरले होते.

डिसेंबर महिन्यात कमी तापमान होते. त्यामुळे पुन्हा थंडी कमी झाली. जानेवारी महिन्यातही थंडी कमीच राहिली. १५ ते १७ अंशादरम्यान सतत किमान तापमान होते, तर फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर गार हवा वाहू लागली आहे. त्यातच किमान तापमानही कमी झाल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे.

चौकट :

सातारा शहरातील किमान तापमान असे :

दि. २६ जानेवारी १५.०७, दि. २७ जानेवारी १४.०६, दि. २८ जानेवारी १४.०२, दि. २९ जानेवारी १४.०७, दि. ३० जानेवारी १४.०६ आणि ३१ जानेवारी १५.०१, दि. १ फेब्रुवारी १५, दि. २ फेब्रुवारी १७.०२, दि. ३ फेब्रुवारी १२.०९, ४ फेब्रुवारी १२.०१ आणि ५ फेब्रुवारी १३.०५.

......................................................

Web Title: Daytime frost due to cold wave!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.