लसीकरणातून पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार - दयानंद खंडागळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:19+5:302021-02-05T09:12:19+5:30
खंडाळा : ग्रामीण भागातील मुलांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जातात. लहान मुलांसाठी राबविलेल्या या ...

लसीकरणातून पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार - दयानंद खंडागळे
खंडाळा : ग्रामीण भागातील मुलांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जातात. लहान मुलांसाठी राबविलेल्या या लसीकरण मोहिमेमुळे पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास खंडाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथे लहान बालकांना लसीकरण करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय अंतर्गत ३६५ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. यावेळी वैदयकीय अधिक्षक डॉ . रवींद्र कोरडे, बाळासाहेब सोनवणे, सीमा यादव, एस. बी. हापण, शायदा शेख यांसह प्रमुख उपस्थित होते.
आधुनिक काळात लोकांचे आरोग्य उत्तम रहावे याकडे विशेष लक्ष पुरविले जाते. या अंतर्गत ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलिओ होऊ नये यासाठी लसीकरणाद्वारे दक्षता घेतली जाते. त्यामुळेच पोलिओमुक्त समाज निर्मिती होण्यास मदत होत आहे. नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही खंडागळे यांनी केले.