लाचखोर प्लंबरला एक दिवसाची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST2021-09-19T04:39:57+5:302021-09-19T04:39:57+5:30

सातारा : गोडोली परिसरातील एका नागरिकाला नवीन नळ कनेक्शन देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या विलास भानुदास कीर्तीकुडाव (वय ४०, रा. ...

A day in jail for a corrupt plumber | लाचखोर प्लंबरला एक दिवसाची कोठडी

लाचखोर प्लंबरला एक दिवसाची कोठडी

सातारा : गोडोली परिसरातील एका नागरिकाला नवीन नळ कनेक्शन देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या विलास भानुदास कीर्तीकुडाव (वय ४०, रा. कोडोली) या प्लंबरला एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या नागरिकाला त्याच्या घरी नवीन नळ कनेक्शन घ्यायचे होते. त्यांनी जीवन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. कनेक्शन मंजूर झाल्यानंतर ते जोडून देण्यासाठी जीवन प्राधिकरणाकडे प्लंबर म्हणून काम करणाऱ्या विलास भानुदास कीर्तीकुडाव याने त्यांना दीड हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांनतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून विलास कीर्तीकुडावला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: A day in jail for a corrupt plumber