दिन दिन दिवाळी... खरेदीची झळाळी!
By Admin | Updated: November 11, 2015 23:48 IST2015-11-11T21:15:59+5:302015-11-11T23:48:58+5:30
नव्याची नवलाई : नव्या वस्तूंनी घरे सजली; पाडवा, भाऊबीजेसाठी भेटवस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी

दिन दिन दिवाळी... खरेदीची झळाळी!
सातारा : दिवाळी सणामुळे सध्या घराघरांत उत्साहाचे वातावरण आहे. मुले, स्त्रिया यांचा तर हा लाडका सण. दीपावली म्हणजे नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूंच्या खरेदीची ही पर्वणीच असते. दिवाळी-दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकजण घरात नवीन वस्तू खरेदी करून आणतात. यामध्ये घरापासून ते कपडे, टीव्ही, आटाचक्की, ओव्हन अशा वस्तूंची
खरेदी केली जाते.
सर्वकाही मिळते घरबसल्या
सुईपासून दागिन्यापर्यंत अन् मोबाईलपासून गाड्यांपर्यंत सर्वकाही आॅनलाईनवर खरेदी करता येऊ शकते, तेही कंपनीच्या मूळ किंमतीत. खरेदीचा हा फंडा आता ग्रामीण भागातही पोहोचला असून विविध कंपन्यांच्या गाड्या माल घेऊन ग्राहकांच्या दारात पोहोचत आहेत. ही खरेदी घरबसल्या मोबाईलवरूनही करता येते. आपल्याला हवी असलेल्या वस्तूचे बुकिंग करायचे अन् ती वस्तू आपल्या हातात पडल्यानंतरच पैसे द्यायचे, अशी सोय असल्यामुळे ही पद्धत आता खेडोपाड्यातही रूजू पहात आहे.
सण, उत्सवात आॅनलाईन शॉपिंगचा धडका
सातारा : दुकानातील दरापेक्षा कितीतरी पटीने स्वस्त वस्तूंची खरेदी घरबसल्या करता येत असल्याचे सत्य उमगल्यामुळे अनेक जण सण, उत्सवांमध्ये आॅनलाईन शॉपिंग करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.एखाद्या कंपनीने तयार केलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत तिची किंमत कैक पटीने वाढलेली असते. मात्र, आॅनलार्ईन शॉपिंगमुळे वस्तू कंपनीच्या किमतीत मिळते. सध्या दीपावलीचा सण असल्यामुळे विविध कंपन्यांनी सवलती दिल्या आहेत. मुळातच स्वस्त आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळत असल्यामुळे आॅनलाईन विश्वासार्हता वाढत आहे. त्यातच सण, उत्सवानिमित्त विविध भेटवस्तू, सवलती मिळत असल्यामुळे अशा खरेदीकडे लोकांचा ओढा वाढला आहे. मोबाईल, कपडे, गाडी, संसारोपयोगी साहित्य, दागिने एवढेच नव्हे तर आपल्याला हवी ती वस्तू आॅनलाईनवर उपलब्ध होते. ग्रामीण भागातही अशा पद्धतीने खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे पैसे वाचत असल्याचे मत ग्राहकांकडून व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
घरगुती उपकरणांना गृहिणींची पसंती
रेडिमेडच्या जमान्यातही टेलर्सची चांदी !