दत्तानाना उत्तेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST2021-08-20T04:45:15+5:302021-08-20T04:45:15+5:30
सातारा : खेड, ता. सातारा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सरचिटणीस दत्तात्रय ऊर्फ दत्तानाना ...

दत्तानाना उत्तेकर यांचे निधन
सातारा : खेड, ता. सातारा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सरचिटणीस दत्तात्रय ऊर्फ दत्तानाना केशवराव उत्तेकर (वय ६४, रा. पिरवाडी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत आमदार अभयसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते समर्थक म्हणून ओळखले जात होते.
खेड ग्रामपंचायतीचे तब्बल ३० वर्षे ते सदस्य म्हणून कार्यरत होते. खेड भागातील समाजकारण व राजकारणात त्यांनी उल्लेखनीय वर्चस्व प्रस्थापित केले होते. पिरवाडी, गोरखपूर, कोयना सोसायटी या भागाचा सातारा नगरपालिकेच्या हद्दीत समावेश करण्यासाठी त्यांनी दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, भावजय, बहिणी, पुतणे, भाचे असा परिवार आहे.
फोटो आहे..