शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

दातेगडावर रंगीबेरंगी फुलांचा उत्सव; निसर्गाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:35 IST

पाटण : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पाटण हा अतिपावसाचा तालुका म्हण्ूान ओळखला जातो. या पावसामुळे पर्यटकांना पाटण तालुक्यातील कोयना धरण आणि परिसरातील लहान-मोठे धबधब्यांची भुरळ पडते. मात्र, पावसाळा संपल्यानंतर तालुक्याचे निसर्ग सौंदर्य आणखीनच खुणावते. पावसाचे दिवस संपताच पाटणच्या वायव्येस पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दातेगडावर निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू होतो. विविध प्रजातीच्या रंगीबेरंगी ...

पाटण : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पाटण हा अतिपावसाचा तालुका म्हण्ूान ओळखला जातो. या पावसामुळे पर्यटकांना पाटण तालुक्यातील कोयना धरण आणि परिसरातील लहान-मोठे धबधब्यांची भुरळ पडते. मात्र, पावसाळा संपल्यानंतर तालुक्याचे निसर्ग सौंदर्य आणखीनच खुणावते. पावसाचे दिवस संपताच पाटणच्या वायव्येस पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दातेगडावर निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू होतो. विविध प्रजातीच्या रंगीबेरंगी रानफुलांचा आगळावेगळा साज डोळ्याचे पारणे फेडतो.छत्रपती शिवाजी महाराजांच्या १०८ गडांच्या यादीमध्ये पाटण तालुक्यातील गुणवंतगड, भैरवडगड, जंगली जयगड आणि निर्सगाच्या सानिध्यात असलेला दातेगड या किल्ल्यांचा समावेश आहे. यामुळे पाटण तालुक्यातील दुर्गप्रेमींची वर्दळ नेहमीच या किल्ल्यांवर पाहायला मिळते. कºहाड-चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहराच्या वायव्येस असणाºया टोळेवाडी गावाजवळ उत्तर दक्षिण पसलेल्या डोंगर रांगांवर तीन टेकड्या दिसतात. त्या तीन टेकड्यांतील मध्यभागाची टेकडी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. हा गड पायथ्यापासून २ हजार फूट उंचीवर आहे. गड आयताकृती असून, लांबी ६०० फूट आहे. गडाच्या चारही बाजूस नैसर्गिक तट आहेत.पाटणच्या अगदी जवळ वायव्येस सह्याद्र्रीच्या अथांग पठारावर निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात टोळेवाडी गावच्या अगदी उशाला सुंदरगड ऊर्फ घेरादातेगड हा किल्ला आहे. सध्या हा किल्ला रंगीबेरंगी फुलांनी बहरला आहे. या फुलांवर वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरे, पक्षी पाहायलामिळत आहेत. फुलांच्या आगमनाने उपेक्षित सुंदरगडाचे निसर्गसौंदर्य खुलून गेले असून, या गडावरील फुलांमुळे आता पाटणच्या पर्यटन क्षेत्राला गती मिळू लागली आहे.लाखोंच्या संख्येने उमललेल्या या फुलांचा आकार चेंडूसारखा असतो. त्यामुळे त्यांना स्थानिक भाषेत ‘गेंदाची फुले’ असे म्हटले जाते. ही मूळ वनस्पती ऐरिओकोलोन या कुळातील आहे. ग्रेमिनिफोलिया या निळ्या फुलांच्या अनेक जाती येथे आढळतात.पाटण, कोयना खोºयातील या परिसरात सध्या वनस्पती अभ्यासक व पर्यटकांना निसर्ग फुलांचा अनोखा रंगोत्सव अनुभवायला मिळत आहे. प्रत्येक विकेंडला या दातेगडावर मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी याठिकाणाहून अनेक दुर्गप्रेमी, पर्यटक आणि वनस्पती अभ्यासक भेटी देत आहेत. पूर्वी कोयना धरण, ओझर्डे धबधबा, वाल्मीक पठार, पवनचक्की, रामघळ, सडावाघापूरचा उलटा धबधबा ही पर्यटनस्थळे गर्दीने फुलून जायची. आता या पर्यटन स्थळांमध्ये दातेगडाचाही समावेश झाला आहे.अखंड दगडाची तलवार विहीरगडाच्या पश्चिम बाजूस अखंड दगडात खोदलेली तलवारीच्या आकाराची विहीर आहे. ही विहीर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. याबरोबरच दातेगडावर दगडामध्ये भव्य आकाराच्या हनुमान आणि विघ्नहर्ता गणेशाच्या मूर्ती आहेत. गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आणि चतुर्भुज असून, एका हातामध्ये परशू आणि अंकुश आहे. या दोन्ही मूर्तींचे वैशिष्ठ्य म्हणजे सकाळी सूर्याेदयावेळी गणपतीच्या मूर्तीवर पडणारी सूर्याची किरणे आणि सायंकाळी सूर्यास्तावेळची मावळतीची किरणे मारुतीच्या मूर्तीवर पडतात. हे विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.