शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अटकेसाठी आलेल्या पोलिसाचा दत्ता जाधवने दाबला गळा! प्रतापसिंह नगर : पाचजणांवर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:11 IST

सातारा : मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी आलेल्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा गुंड दत्ता जाधवने गळा दाबल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरात ही घटना घडली होती.

सातारा : मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी आलेल्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा गुंड दत्ता जाधवने गळा दाबल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरात ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दत्ता जाधवसह पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

गुंड दत्ता जाधवला पकडण्यासाठी शुक्रवारी रात्री पोलीस प्रतापसिंहनगर येथे गेले होते. दोनशेहून अधिक पोलिसांचा ताफा प्रतापसिंहनगरात तैनात करण्यात आला होता. तसेच साध्या वेशातील पोलीसही त्या परिसरात फिरत होते. प्रतापसिंहनगरात पोलीस आल्याचे समजताच गुंड दत्ता जाधव हा घरातून बाहेर पडला. शेजारील एका घरात बाहेरहून कुलूप लावून आतमध्ये फॅनची हवा खात बसला होता. परंतु आतील लाईट चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दत्ता जाधव याच घरात असावा, अशी शंका पोलिसांना आली. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी दत्ता जाधवने पोलिसांना विरोध केला. पोलिसांनी दत्ता जाधवला पकडल्याचे समजल्यानंतर त्याठिकाणी लक्ष्मी जाधव, गंगूबाई, रमेश खुडे, झुंबर यांच्यासह अन्य काहीजण तेथे आले. जाधवसह इतरांनी पोलीस पथकातील स्वामी यांचा गळा दाबला तसेच त्यांना खाली पाडून मारहाण करणे सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी बळाचा वापर करत हल्ला करणाºयांना त्याठिकाणाहून पिटाळून लावले.तक्रार पोलीस कर्मचारी राहुल खाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून, दत्ता जाधवसह पाचजणांवर गुन्हा दाखल आला.दोघांत मिळून टेंडर..इकबाल हुसेन व दत्ता जाधव यांनी एकत्र येऊन किसन वीर कारखान्यातील भंगार मालाचे टेंडर २५ जानेवारी २०१८ ला भरले होते. दरम्यान, टेंडरची मूळ रक्कम व जीएसटीसह अंदाजे १ कोटी ६१ लाख रुपये कारखान्याच्या खात्यामध्ये भरले. त्यानंतर भंगार माल ट्रकद्वारे कारखान्याबाहेर काढत असताना वेळोवेळी दत्ता जाधव व त्याच्या साथीदारांनी इकबाल हुसेन व कामगारांना धमकावून लाखो रुपये खंडणीस्वरुपात घेतले.दत्ता जाधवने उकळली ३८ लाखांची खंडणीपाचवड : गुंड दत्ता जाधव व त्याच्या टोळीला खंडणीच्या गुन्ह्यात मोक्कांतर्गत कारवाई करून जेरबंद केल्यानंतर शनिवारी भुर्इंज पोलीस ठाण्यात याच टोळीविरोधात किसन वीर कारखान्यातील भंगार मालाचे टेंडर मिळविण्यासाठी ३८ लाख रुपयांची खंडणी वसुली केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इकबाल सय्यदतालीब हुसेन( सध्या रा. भुर्इंज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. किसन वीर सहकारी साखर कारखान्यातील भंगार मालाचे टेंडर भरू नका, अशी दमबाजी करीत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, ट्रक पेटवून देण्याची धमकी देऊन तसेच जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने पुणे येथे नेऊन वेळोवेळी मागणी करून ३८ लाख रुपये रुपयांची खंडणी दत्ता जाधवने उकळल्याचे समोर आले आहे. दत्ता जाधवचा मित्र पैलवान, शुकराज पांडुरंग घाडगे, शामराव तिवारी, कुमार खत्री व अन्य अनोळखी चारजण यांनी हे पैसे घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा