शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील गावांचा अंधार आता दूर होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 16:49 IST

Mahavitran Satara : ग्रामपंचायत हद्दीमधील सार्वजनिक वीज पुरवठा थकित वीज बिलापोटी तोडला होता, तो पूर्ववत जोडण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाच्यावतीने विभागाला देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देवीज जोडण्या पूर्ववत करण्याच्या सूचनासरपंच परिषदेच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी

सातारा : ग्रामपंचायत हद्दीमधील सार्वजनिक वीज पुरवठा थकित वीज बिलापोटी तोडला होता, तो पूर्ववत जोडण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाच्यावतीने विभागाला देण्यात आले आहेत.

दरम्यान ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक रस्त्यांवरील बिल बिल भरणे शक्य नसल्याचा मुद्दा सरपंच परिषदेत मांडला त्याबाबत नेमके धोरण ठरविण्या संदर्भात तज्ञांची समिती नेमण्यात आली असून १५ ऑगस्ट पूर्वी ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने मंगळवारी (दि.२०) मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये ग्रांपंचायतीच्या समस्या बाबत प्रदीर्घ व सकारात्मक चर्चा झाली. तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व सबंधित विभागाला तात्काळ आदेश देण्यात आला आहे. यामुळे सरपंच परिषदेच्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला भरीव यश मिळाले असून सरपंच वर्गामध्ये कमालीचा आनंद पसरला आहे.सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस ऍड. विकास जाधव सर्व राज्य पदाधिकारी विश्वस्त यांच्या वतीने सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटले.

या शिष्टमंडळात सरपंच परिषदेचे राज्य विश्वस्त व सातारा कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, जिल्हा सचिव शत्रुघ्न धनवडे व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.मागील काही महिन्यापासून विदयुत विभागाने राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा करणाऱ्या विदयुत पंपाचे कनेक्शन तोडले होते. यामुळे सरपंच परिषद मुंबई राज्यात आक्रमक झाली होती. त्या आनुशंगाने सरपंच परिषदेने राज्यात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने सुरू केली होती. तसेच या निर्णयामुळे भर पावसाच्या दिवसात अनेक ग्रामपंचायती व लाखो लोक अंधारात होती.

यामुळे राज्य शासनावर मोठ्या प्रमाणात गावकर्यांचा व सरपंच परिषदेचा रोष होता; परंतु आजच्या या बैठकीत महाराष्ट्रातील स्ट्रीट लाईट चालू करणेबाबत सकारात्मक चर्चा झाली तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व आदेश देण्यात आला आहे.

पुन्हा अनेक गावात वीज पुर्ववत होऊन मोठी समस्या मिटणार आहे. तसेच या पुढे देखील राज्य सरकार सरपंच परिषद व सरपंचाच्या हितासाठी कटीबद्ध व सकारात्मक असे आश्वासन दिले आहे. याबद्दल मी सरपंच परिषदेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो.- नितीन पाटील,जिल्हा अध्यक्ष,सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र), सातारा.

महाराष्ट्रातील एकूण बिलाची होणार तपासणीमहाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतींची या बिलाबाबत तक्रार आहे. विज बिल भरून देखील दंड आकारला गेल्याचा ग्रामविकास विभागाचा आरोप आहे. या सर्व बिलांची चौकशी करण्यासाठी वेगळी समिती देखील नेमण्यात आलेली आहे. 

 

टॅग्स :sarpanchसरपंचSatara areaसातारा परिसरAjit Pawarअजित पवार