शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

फलटण तालुक्यात डेंग्यूूूचे पुन्हा डोके वर, मुंजवाडीत साथ : आठ रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:26 IST

फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी फलटण येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नागरिकांनी या आजाराची धास्ती घेतली आहे.

ठळक मुद्देफलटण तालुक्यातील डेंग्यू, इतर आजारांच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढतालुक्यात आजपर्यंत तीन नागरिकांचा डेंग्यूमुळे मृत्यू आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांमधून मागणी

फलटण : फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी फलटण येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नागरिकांनी या आजाराची धास्ती घेतली आहे.

फलटण तालुक्यातील पूर्व भागात महिन्यापासून डेंग्यू व इतर आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उलट्या, जुलाब, तापासह मलेरियाने ग्रस्त रुग्णांचाही यात समावेश आहे.

मुंजवडी गावात सध्या अनेक रुग्ण ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. अनेक रुग्ण बरड येथील सरकारी व फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आतापर्यंत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. असे असूनही शासकीय यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांनी आजारांविषयी फलक, पत्रके, दवंडी, सूचना, जनजागृती, औषध फवारणीसारखी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

फलटण तालुक्यात आजपर्यंत तीन नागरिकांना डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आजाराची नागरिकांची धास्ती घेतली आहे. या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरHealthआरोग्य