वीजतारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:40+5:302021-03-08T04:36:40+5:30

नेटवर्क गायब (फोटो : ०७इन्फोबॉक्स०१) सणबूर : बनपुरी परिसरात मोबाइलचे नेटवर्क गायब असून मोबाइल कंपनीचे टॉवर ‘असून अडचण नसून ...

Danger of power lines | वीजतारांचा धोका

वीजतारांचा धोका

नेटवर्क गायब (फोटो : ०७इन्फोबॉक्स०१)

सणबूर : बनपुरी परिसरात मोबाइलचे नेटवर्क गायब असून मोबाइल कंपनीचे टॉवर ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. त्यामुळे मोबाइलधारकांना रेंज मिळवण्यासाठी झाडांवर किंवा घरांच्या छतावर जावे लागत आहे. सध्या शिक्षणासह दैनंदिन कामातही इंटरनेटची गरज भासते. मात्र, या विभागात मोबाइलला रेंज नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.

मार्गावर अतिक्रमण

कऱ्हाड : येथील दत्त चौक ते आझाद चौक परिसरातील रस्त्याकडेला किरकोळ दुकानदारांकडून व साहित्य विक्रेत्यांनी जाहिरात फलक ठेवून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. पादचारी मार्गावर अस्ताव्यस्त फलक लावणा-यांवर पालिकेकडून कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

श्वानांचा वावर

कऱ्हाड : कऱ्हाडसह मलकापूर व सैदापूर परिसरात भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. हे श्वान अचानकपणे रस्त्यावरून ये-जा करणा-या नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होते. या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Web Title: Danger of power lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.