रोडरोमिओंविरोधात पोलिसांच्या हाती दंडुका
By Admin | Updated: December 30, 2014 23:23 IST2014-12-30T21:55:23+5:302014-12-30T23:23:16+5:30
खटामध्ये कारवाई मोहीम: विद्यार्थी, पालकांमधून समाधान व्यक्त

रोडरोमिओंविरोधात पोलिसांच्या हाती दंडुका
खटाव : येथील महाविद्यालय परिसरात अनेक दिवसांपासून रोडरोमिओंचा वावर वाढला असून याचा शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी रोडरोमिओंना चपराक बसविण्यासाठी पोलिसांनी खटावमध्ये कारवाई मोहीम सुरु केली असून याबद्दल विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
खटावमध्ये रोडरामीओंपासून होणारा त्रास तसेच त्यांच्या अश्लिील हरकती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शाळा तसेच महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत चौकात तसेच बसस्थानक आवारात रोडरोमिओंची टोळी उभी असते. विनाकारण दुचाकीवरुन घिरट्या मारणे, धुम स्टाईलने वेगात गाडी चालविणे अशा अनेक घटना रोडरामीओंकडून होताना दिसतात.
या बाबिंना आळा घालण्यासाठी यापूर्वी शाळा व्यवस्थापन समीती, ग्रामपंचायत व पुसेगाव पोलीस ठाण्याच्या सहकार्याने ठोस पावले उचलण्यात आली होती. त्यामुळे काहीदिवस शालेय विद्यार्थी निर्धास्त होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून पुन्हा या प्रवृत्तीत वाढ
होऊ लागल्यामुळे पुसेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने रोडरोमीओंना चाप बसवण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असुन पोलीस अचानक पणे शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत येउन अशा रोडरोमीओंची धरपकड करुन प्रसंगी प्रसादही दिला जात आहे.
या कारवाईची रोडरोमिओंनी धास्ती घेतल्याने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांना कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधुन त्याची पोलिसांना माहिती द्यावी. अशा रोडरामीआेंना कठोर शासन केले जाईल. या मोहीमेमुळे रोडरोमिओंची दहशत कमी होईल.
- राजेंद्र सावंत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक
महाविद्यालयाच्या आवारात अनोळखी विद्यार्थी आढळल्यास त्याची चौकशी करुन त्याला समज दिली जाते. तसेचर
महिला प्राध्यापकांकडे मुलींनी होणाऱ्या त्रासा विषयी माहिती दिल्यास त्यावर वेळीच कठोर कारवाई ही महाविद्यालयाच्या वतीने
करण्यात येते.
- संजय पाटील
प्राचार्य, शहाजीराजे महाविद्यालय