डबेवाडीत वरातीत नाचण्याच्या कारणातून खून
By Admin | Updated: June 14, 2014 01:36 IST2014-06-14T01:20:29+5:302014-06-14T01:36:08+5:30
एकजण गंभीररीत्या जखमी

डबेवाडीत वरातीत नाचण्याच्या कारणातून खून
सातारा : वरातीत नाचण्याच्या कारणातून डबेवाडी (ता. सातारा) येथे काल, गुरुवारी रात्री झालेल्या सशस्त्र मारामारीत साताऱ्यातील तरुणाचा खून झाला, तर एकजण गंभीररीत्या जखमी झाला. विकास प्रकाश पवार (वय २८, रा. मंगळवार पेठ) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. डबेवाडीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
याबाबत फिर्याद अमोल शिवदास चौगुले (वय २५, रा. मंगळवार पेठ, सातारा) याने दिली आहे. वरातीत नाचण्यावरून वाद झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा घरी जाताना ही खुनाची घटना घडली. तक्रारीनुसार, सतीश विठ्ठल माने (रा. मंगळवार पेठ, सातारा), अक्षय ऊर्फ पप्पू बबन पवार, सागर जयसिंग देवरे, प्रदीप नारायण देवरुखे, संग्राम चंद्रकांत माने, सागर दादासो माने, अभिजित बबन पवार, सागर कार्वे (सर्व रा. डबेवाडी) यांच्यासह इतर पाचजणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद आहे. (प्रतिनिधी)