‘डान्स शॉप अँड शो’ची उद्या साताऱ्यात रॅली

By Admin | Updated: December 23, 2014 23:45 IST2014-12-23T21:55:05+5:302014-12-23T23:45:36+5:30

पंकज डान्स अ‍ॅकॅडमी : सांताक्लॉजही होणार सहभागी-- लोकमत माध्यम प्रायोजक

'Dance Shop and Show' will be held tomorrow in Satara | ‘डान्स शॉप अँड शो’ची उद्या साताऱ्यात रॅली

‘डान्स शॉप अँड शो’ची उद्या साताऱ्यात रॅली

सातारा : ‘पीसीए डान्स शॉप अँड शो’ या सिद्धेश पै सोबतच्या वर्कशॉपच्या पार्श्वभूमीवर पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी आणि नृत्यप्रशिक्षक २५ रोजी सातारा शहरातून रॅली काढणार आहेत. यात सांताक्लॉजही सहभागी होणार आहे.
सायंकाळी पाच वाजता कमानी हौदापासून या रॅलीत सुरुवात होईल. राजपथावरून मोती चौक ते खालचा रस्ता (मुख्यालय रोड) मार्गे पोवई नाक्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर रॅलीचा समारोप होईल. २ जानेवारीपासून दहा दिवस डीआयडी फेम सिद्धेश पै सातारकरांना नृत्याचे धडे देणार आहे. इतरांसाठी वर्कशॉपची फी २५०० रूपये असून लोकमत सखीमंच, बालविकास मंच, युवा नेक्स्टच्या सभासदांकरिता ५०० रुपये सवलत दिली जाणार आहे.
सिद्धेश सोबत लाईव्ह स्टेज शोमध्ये डान्स करण्याची संधी वर्कशॉपमध्ये सहभागी होणाऱ्या सातारकरांना मिळणार आहे. वयाचे कोणतेही बंधन नसून महिला व मुलांसाठी स्वतंत्र बॅचेसमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी होण्यासाठी पंकज चव्हाण, डान्स अ‍ॅकॅडमी कमानी हौदाजवळ, सातारा येथे संपर्क साधावा, असे
आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)


‘डान्स वर्कशॉप’ला सातारकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्कशॉपमधये सहभागी होण्यासाठी मोजक्याच जागा शिल्लक राहिल्या असून इच्छुकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात
आले आहे.

Web Title: 'Dance Shop and Show' will be held tomorrow in Satara