दत्तगुरुंसमोर खाकी नतमस्तक !
By Admin | Updated: December 9, 2014 00:29 IST2014-12-08T23:56:59+5:302014-12-09T00:29:24+5:30
भाविकांची गर्दी : पोलीस दूरक्षेत्र आवारात दत्त जयंती साजरी

दत्तगुरुंसमोर खाकी नतमस्तक !
मल्हारपेठ : मल्हारपेठ येथे पोलीस दूर क्षेत्राच्या आवारात दत्त जयंती सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. महिला भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळ्यास मोठी गर्दी करून भक्तगण जमला होता.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्र आवारात दत्त मंदिर स्थापन केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून या दत्तमंदिरात सर्व ग्रामस्थ मोठ्या भक्तीभावाने पूजा करून देवदर्शनासाठी येतात. दत्तजयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थ, व्यापारी, पोलीस कर्मचारी, दत्त जन्म सोहळा साजरा करतात. त्याप्रमाणे काल नुकतीच दत्तजयंती साजरी करण्यात आली. सकाळपासून दत्तमंदिरात अभिषेक, पूजा, आरती, दिवसभर भजनांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी दत्त जन्म सोहळा महिलांनी पाळणा म्हणून व अशोक स्वामी यांनी मंत्रपठण, दत्तआरतीनंतर जन्मसोहळा साजरा केला.
देवदर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक विकास धस व अधिकारी यांनी भेट देऊन देवदर्शन घेतले.
उपस्थित भक्तगणांचे स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस हवालदार सतीश जाधव, प्रवीण काटवटे, सचिन पाटील, अनिता शेंडगे यांनी केले.
दत्त जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मल्हारपेठ व परिसरातील भक्तगणांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ
घेतला. (वार्ताहर)