सिलिंडरच्या भडक्याने सर्वसामान्य घायाळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:53+5:302021-02-06T05:15:53+5:30
सातारा : गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने याची सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ बसत आहे. गेल्या दीड महिन्यात ...

सिलिंडरच्या भडक्याने सर्वसामान्य घायाळ !
सातारा : गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने याची सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ बसत आहे. गेल्या दीड महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ७५ रुपयांची वाढ झाली असून, सध्या १४.२ किलोच्या सिलिंडरचा दर ७२४ रुपयांवर पोहोचला आहे.
पेट्रोल व डिझेलचे दर हळूहळू शंभरीकडे वाटचाल करू लागले असताना आता गॅस सिलिंडरचे दर अचानक वाढल्याने सर्वसामान्यांचे अर्थचक्र कोलमडून लागले आहे. ऑइल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढविली आहे. यापूर्वी दि. १६ डिसेंबर रोजी सिलिंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांची वाढ झाली होती. अशाचप्रकारे पाच किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किमतीतही तब्बल ७० रुपयांची वाढ झाली आहे.
सध्या साता-यात घरगुती गॅस सिलिंडरचा दर ६९९ रुपयांवरून ६२४ रुपयांवर गेला आहे. तर व्यावसायिक सिलिंडरचा दरही १३४० रुपयांवरून १५३९ रुपयांवर पोहोचला आहे. अगोदरच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे नागरिकांची आपल्या गरजांना कात्री लावून काटकसर सुरू केली आहे. अशातच गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सामान्यांचे जगणे मुश्कील बनू लागले आहे.
(कोट)
लॉकडाऊनपासून आमचा उदरनिर्वाह काटकसरीने सुरू आहे. अनेक गरजा आम्ही मर्यादित ठेवल्या आहेत. मात्र, सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत असल्याने याची मोठी झळ बसत आहे. शासनाने किमान जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवाव्यात.
- स्वाती नितीन झोरे,
गुरुवार पेठ, सातारा
(गॅस सिलिंडरच्या अशा आहेत किमती)
वाढ जुना दर नवा दर
१४.२ किलो २५ ६९९ ७२४
५ किलो ७० ४०० ४७०
१९ किलो १९९ १३४० १५३९
फोटो : सिलिंडरचा फोटो वापरणे