स्वराज अ‍ॅग्रो टुरिझम, सेलेब्रेशनला ग्राहकांची खास पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:18 AM2021-01-24T04:18:40+5:302021-01-24T04:18:40+5:30

निसर्गरम्य पश्चिम भागात अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण ही मोठ्या प्रमाणावर होत असते. अशा निसर्गरम्य भागात वाईपासून दहा ...

Customers prefer Swaraj Agro Tourism, Celebration | स्वराज अ‍ॅग्रो टुरिझम, सेलेब्रेशनला ग्राहकांची खास पसंती

स्वराज अ‍ॅग्रो टुरिझम, सेलेब्रेशनला ग्राहकांची खास पसंती

googlenewsNext

निसर्गरम्य पश्चिम भागात अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण ही मोठ्या प्रमाणावर होत असते. अशा निसर्गरम्य भागात वाईपासून दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वारखडवाडी-गाढवेवाडी रस्त्यावर वाई वुड्स प्रोजेक्टशेजारी स्वराज अ‍ॅग्रो टुरिझमची एक आकर्षक संकल्पना प्रयोगशील शेतकरी सचिन फणसे-पाटील यांनी साकारली आहे. शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करीत असताना अ‍ॅग्रो टुरिझम ही मोठी भांडवली गुंतवणूक व त्यामधील दर्दी असणाऱ्यांचाच व्यवसाय अशा रूढीला छेद देत केवळ दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर शेती करणाऱ्या नवयुवकांना आदर्श ठरेल, असा प्रोजेक्ट सचिन फणसे-पाटील यांनी नावारूपाला आहे.

अ‍ॅग्रो टुरिझमविषयी माहिती सांगताना सचिन फणसे-पाटील म्हणाले, ‘वाईपासून दहा किलोमीटरवर निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या स्वराज अ‍ॅग्रो टुरिझममध्ये लग्न, गेट-टुगेदर, मिटिंग, बॅचलर पार्टी, बर्थ डे पार्टी, भिशी ग्रुप, कपल पार्टी, पार्टीची व राहण्याची उत्तम सोय असून, जवळ असलेल्या धरणात बोटिंग, घोडा, बैलगाडी सफारीचा आनंद लुटू शकता. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, तंदूर, मालवणीमध्ये स्वादिष्ट व्हेज थाळी, चिकन थाळी, मटण थाळी उपलब्ध, चोवीस तास लाईटची सोय आहे. तरी वाईसह जिल्ह्यातील नागरिकांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी.

Web Title: Customers prefer Swaraj Agro Tourism, Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.