संचारबंदीचे उल्लंघन; सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST2021-06-26T04:27:08+5:302021-06-26T04:27:08+5:30

पाचगणी: कोरोनाचे संकट आ वासून पुढे असताना पोलीस आपल्यासमोर आहेत, याचेही भान न ठेवता घाटजाई कमानीपुढेच शिवीगाळ तसेच संचारबंदीचे ...

Curfew violation; Filed charges against seven people | संचारबंदीचे उल्लंघन; सात जणांवर गुन्हा दाखल

संचारबंदीचे उल्लंघन; सात जणांवर गुन्हा दाखल

पाचगणी: कोरोनाचे संकट आ वासून पुढे असताना पोलीस आपल्यासमोर आहेत, याचेही भान न ठेवता घाटजाई कमानीपुढेच शिवीगाळ तसेच संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांवर पाचगणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतची पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, घाटजाई कमानीसमोर ऋतुराज सुरेश साळुंखे (वय १८), सुरेश राजाराम साळुंखे (५२), प्रभात सुरेश साळुंखे (२०, रा. भीमनागर पाचगणी), प्रफुल्ल शिवाजी खुडे (सह्याद्रीनगर वाई), सागर शेलार (२५), साहिल शेलार (२७), रोहन शेलार (२३) व अन्य पाच ते सात जण (रा. बावधन, ता. वाई) यांच्यामध्ये शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घाटजाई कमानीसमोर शिवीगाळ व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक साठे करीत आहेत.

Web Title: Curfew violation; Filed charges against seven people