‘स्वाभिमानी’च्या सभांना गर्दी
By Admin | Updated: August 12, 2014 23:21 IST2014-08-12T21:53:14+5:302014-08-12T23:21:39+5:30
मनोज घोरपडे : ‘कऱ्हाड उत्तर’ मध्ये चमत्कार घडविणार

‘स्वाभिमानी’च्या सभांना गर्दी
सातारा : ‘कऱ्हाड उत्तरमधील ‘स्वाभीमानी’च्या सभांना मतदारांमधून उत्स्फूर्त गर्दी लाभत आहे. यातून आपण नक्कीच चमत्कार घडविणार आहोत,’ असा विश्वास मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.
वेळू, ता. कोरेगाव येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलताना म्हणाले, आपली बांधिलकी या मतदार संघातील जनतेशी असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कदापिही कमी पडणार नाही. येथील स्वाभिमानी जनता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पारड्यात झुकतेमाप देऊन विकासाची लढाई लढण्यासाठी सज्ज झाली आहे. या जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग चालवले असले तरी जनता यावेळी राज्यकर्त्यांच्या दिशाभूलीला बळी पडणार नाही.
घोरपडे पुढे म्हणाले, ‘वेळूमधील पाणी प्रश्न गंभीर असून हा प्रश्न सोडविण्यासाठी ५ वर्षे राज्यकर्त्यांना सवड मिळाली नाही.
या बैठकीस विजय भोसले, प्रकाश घोरपडे, अंजन घाडगे, संतोष भोसले, समाधान भोसले, नवनाथ केंजळे, विक्रम क्षीरसागर, विशाल भोसले, वैभव भोसले, प्रशांत कणसे, अविनाश जगदाळे, दीपक ननावरे, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, मनोजदादा घोरपडे यांनी शामगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विकासकामांच्या नुसत्या वल्गना करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे व महायुतीच्या उमेदवारांना जनतेने ताकद द्यावी. सत्ता बदलाशिवाय या भागाच्या विकासाचा अनुशेष दूर होणार नाही. (प्रतिनिधी)