शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Mahabaleshwar- जलधारा अन् चोहीकडे धुक्याची दुलई, महाराष्ट्राच्या 'चेरापुंजी'त पर्यटक लुटतायेत मनमुराद आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:17 IST

जलविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा जलाशय देखील पावसामुळे भरण्याच्या मार्गावर

अजित जाधवमहाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस अंगावर झेलण्यासाठी अन् धुक्याच्या दुलईचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी हौशी पर्यटकांची पावले या पर्यटन नगरीकडे वळू लागली आहेत.महाबळेश्वरला निसर्गाचं वरदान लाभलं असून, येथील हिरवीगार वृक्षराजी, उंचच-उंच डोंगर रांगा, त्यातून फेसाळणारा जलप्रपात, पुरातन मंदिरे व ब्रिटिशकालीन पॉईंट पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देतात. पावसाळा सुरू झाल्यापासून तर येथील निसर्ग हिरवाईने भरून गेला आहे. धो-धो बरसणाऱ्या जलधारा अन् चोहीकडे पसरलेली धुक्याची दुलई स्वर्गीय अनुभव देत आहे. हाच आनंद लुटण्यासाठी काही हौशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देऊ लागले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी काही पॉईंट बंद करण्यात आले असले, तरी शहरातील मुख्य बाजारपेठ, वेण्णा जलाशय व क्षेत्र महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.महाबळेश्वरवासियांची तहान भागविणारा अन् जलविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा जलाशय देखील पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आला असून, जलाशयाचे विलोभनीय दृश्य नजरेत सामावून घेण्यासाठी पर्यटक हमखास या जलाशयाला भेट देत आहेत. परतीच्या प्रवासाला जाणारा प्रत्येक पर्यटक येथील सौंदर्य आपल्या कॅमेरात कैद करत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानRainपाऊसtourismपर्यटन