शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाई खून खटल्यात माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास, आरोपी संतोष पोळने विचारले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 15:58 IST

राज्यभर गाजले होते वाई खून खटला प्रकरण

वाई : राज्यभर गाजलेल्या वाई खून खटल्याची सुनावणी वाई न्यायालयात सुरू असून, शुक्रवारी माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास सुरू झाला. आरोपी संतोष पोळ याने अनेक प्रश्न केले. यावेळी न्यायालयात सरकारी वकील ॲड. उज्वल निकम हेही उपस्थित होते. दरम्यान, पुढील सुनावणी १२ रोजी होणार आहे.वाई खून खटल्याची अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. संतोष पोळचे वकील ॲड. हुटगीकर यांनी वकीलपत्र काढून घेऊन यापुढे कामकाज चालविणार नसल्याचे पत्र न्यायालयास दिले. यानंतर संतोष पोळने या खटल्याचे मी स्वतः कामकाज चालविणार असल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने त्याला याकामी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील पाहिजे असल्यास उपलब्ध करून देऊ. माहितीतील दुसरा कोणताही वकील हवा असल्यास तुम्हाला दिला जाईल, असे सांगितले. मात्र, त्याने यास नकार दिला.दरम्यान, या खटल्यात यापूर्वीच माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे तिचा शुक्रवारपासूनच उलट तपास संतोष पोळ याने स्वतः घेतला. यावेळी तिला नथमल भंडारी यांच्या खुनानंतर तुम्ही कुठे गेला?, नंतर काय केले? असे प्रश्न विचारले. तुम्ही किती मोबाइल वापरत होता, तुमच्याकडे किती सिमकार्ड होते तसेच मोबाइलचे नंबरही पोळने विचारले. यानंतर तिने, मी दोनच मोबाइल वापरत असल्याचे व नंबर लक्षात नसल्याचे सांगितले. यावर, तुम्ही १३ सिमकार्ड वापरत होता. न्यायालयास खोटी माहिती देत असल्याचा प्रश्न पोळने केला. यावर ज्योती मांढरेने माझ्या मोबाइलबाबत काही आठवत नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाईCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय