बिबी-सासवड परिसरात मुसळदार पावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:02+5:302021-06-01T04:30:02+5:30
आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील बिबी-सासवड परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सोमवारी हजेरी लावली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी ...

बिबी-सासवड परिसरात मुसळदार पावसाने पिकांचे नुकसान
आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील बिबी-सासवड परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सोमवारी हजेरी लावली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. कडवळ, मका, ऊस, भुईमुग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
फलटण पश्चिम भागात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. बिबी, सासवड, हिंगणगाव, घाडगेवाडी, मुळीकवाडी, टाकोबाईचीवाडी, कापशी परिसरात सलग दोन दिवस दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडासह, मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वीजपुरवठा खंडित झाला तर भुईमूग काढणीचा खोळंबा झाला. कडवळ, मका पिके भुईसपाट झाली. घाडगेवाडी येथे मोठ्या बाभळीचे झाड रस्त्यावर पडल्याने घाडगेवस्तीवर जाणारा रस्ता बंद झाला होता.
फोटो ३१आदर्की रेन
फलटण तालुक्यातील मुळीकवाडी परिसरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कडवळ भुईसपाट झाले. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)