पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:14+5:302021-02-05T09:17:14+5:30

....... नागरिकांची गैरसोय सातारा : शहरातील राजवाडा चौपाटीवरील बेशिस्तपणामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कोरोना पूर्वकाळातील राजवाडा चौपाटी खाऊ गल्ली ...

Crop damage | पिकांचे नुकसान

पिकांचे नुकसान

.......

नागरिकांची गैरसोय

सातारा : शहरातील राजवाडा चौपाटीवरील बेशिस्तपणामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कोरोना पूर्वकाळातील राजवाडा चौपाटी खाऊ गल्ली म्हणून वापरली जात होती. कोरोनामुळे चौपाटी बंद आहे. मात्र गेली काही महिन्यांपासून तिचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जात आहे.

.......

खड्ड्यांमुळे अपघात

सातारा : सातारा - कोरेगाव रस्त्यावर कृष्णानगर येथील वीजवितरण कंपनीसमोरील रस्त्यावर काही वर्षांपूर्वी गळती काढण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अनेकजण या खड्ड्यात पडून जायबंदी झाले आहेत.

.......

पुलाची मागणी

सातारा : सातारा तालुक्यातील गोळेगाव व वेचले गावच्या सीमाभागाच्या हद्दीतील पुलाचे काम दोन वर्षांपर्यंत बंद असल्याने पावसाळ्यात तसेच सद्य:स्थितीत ऊस वाहतुकीसाठी अरुंद रस्त्यावरून वाहतूक करावी लागत आहे. या पुलाच्या कामासाठी प्रशासनाने लक्ष घालून या पुलाचे अर्ध्यावर बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत येथील शेतकरी लहू चव्हाण यांनी केले आहे.

.......

मॉर्निंग वाॅकला गर्दी

सातारा : सातारा शहर व परिसरामध्ये पहाटेच्या वेळी मॉर्निंग वाॅकला गर्दी होऊ लागली आहे. वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाली होती. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दिवसभर कडक ऊन पडत असून, रात्री व पहाटेच्या वेळी तापमानाचा पारा चांगलाच घसरत आहे.

.....

रुग्णवाहिका अडकली

सातारा : सातारा शहरालगत वाडे फाटा उड्डाणपूल ते पाटखळ माथा दरम्यान मंगळवारी दिवसभरात वारंवार ट्रॅफिक जाम झाले. धक्कादायक बाब म्हणजे सायंकाळी रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांचे हाल झाले. या सर्व प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

......

पाणीपुरवठा सुरळीत

सातारा : नगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या विलासपूर ग्रामपंचायत हद्दीतील तीन कॉलन्यांतील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सुस्कारा टाकला आहे. विलासपूरमध्ये पालिकेच्या स्वच्छता कामगाराकडून गटारीची स्वच्छता करताना फॉरेस्ट कॉलनी, गणेशनगर व राधिकानगर यांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली होती.

........

कुत्र्याला जीवदान

महाबळेश्वर : माणूस एखाद्या संकटात सापडला तर त्याला व्यक्त होता येते. मात्र, एखादे मुके जनावर जर अशा संकटात सापडले तर त्याचे किती हाल होतील याचा विचार न केलेलाच बरा. येथे प्लास्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या एका कुत्र्याची प्राणिमित्राने सुटका करत या मुक्या प्राण्याला जीवदान दिले.

.......

जीर्णोद्धाराचे काम

सातारा : सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लिंब गोवे येथील कृष्णा नदीच्या पात्रात असलेल्या मंदिराचे काम लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे.

........

राष्ट्रीय कार्यशाळा

सातारा : येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये नुकतीच इतिहास विभागाच्यावतीने एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात झाली. अध्यापन क्षेत्रात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान व पद्धतीचा वापर करण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने इतिहास विभाग व दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने कोरियन भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

......

प्रवासी त्रस्त

सातारा : येथील बसस्थानक परिसरात रस्त्याकडेला अस्ताव्यस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत आहे. लावलेल्या वाहनामुळे ये-जा करणारी वाहने दिसत नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. येथील पोलीस प्रशासनाने तातडीने वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे.

Web Title: Crop damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.