शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सत्तेच्या बळावर १४०० जणांवर गुन्हे : पाटील-वारणा योजनेच्या विरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:13 AM

दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ

ठळक मुद्देचिपरीत वारणा योजनेच्या विरोधात साखळी उपोषण

उदगाव : दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ तालुका गप्प बसणार नाही आणि नको ते आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी धरणग्रस्तांच्या वसाहतींना आतापर्यंत का पाणी दिले नाही, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान आमदार उल्हास पाटील यांनी दिले.

वारणा बचाव कृती समितीच्यावतीने सुरू असलेले साखळी उपोषण चिपरी (ता. शिरोळ) येथे शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी स्वागत सरपंच धनपाल कनवाडे यांनी केले. प्रास्ताविक ‘आंदोलन अंकुश’चे अमोल राजगिरे यांनी केले. यावेळी वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, वारणाकाठच्या जनतेला गोड बोेलून वारणेचे पाणी इचलकरंजीला नेण्याचा डाव फसला आहे.

त्यामुळे नको ते उद्योग करीत वारणाकाठच्या जनतेला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, कोणत्याही बदनामीला न घाबरता वारणेचे पाणी देणार नाही, असे सांगितले.जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर म्हणाले, पंचगंगा नदी उशाला असून, ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न न करता शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा डाव इचलकरंजीचा आहे. यामुळे शेतकºयांनी व वारणाकाठच्या नागरिकांनी जागृत राहावे, असे सांगितले.यावेळी उपसरपंच प्रवीण देसाई, बबन यादव, सुरेश भाटिया, भगवान कांबळे, रमेश रजपूत, रावसाहेब शेळके, हिंदुराव जगदाळे, श्रीवर्धन भोसले, सतीश मलमे, गुंडू दळवी, मानाजीराव भोसले, रघुनाथ होगले, प्रसाद धर्माधिकारी, बजरंग खामकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सत्तेच्या जिवावर कारनामेचिपरी येथे साखळी उपोषणात बोलताना शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, चार लाख लोकसंख्या असलेले इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी सत्तेच्या जिवावर नको ते कारनामे करीत आहेत. तर वारणाकाठची लोकसंख्याही बारा लाखांहून अधिक आहे. याच्याविरोधात जर कारनामे करण्याचा घाट घातला असला तर अशांना वारणाकाठची जनता लवकरच जागा दाखवेल. त्यामुळे यापुढे विचार करून बोलावे, असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार हाळवणकर यांना दिला.चिपरी (ता. शिरोळ) येथे अमृत योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणात बोलताना आमदार उल्हास पाटील. व्यासपीठावर महादेव धनवडे, सुरेश कांबळे, बजरंग खामकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक