शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर फौजदारी गुन्हे, मुख्याधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:11 IST

Muncipal Corporation, karad, water, sataranews कऱ्हाड शहरात चोरून नळ कनेक्शन घेतल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत नळ कनेक्शनच्या माध्यमातून पाणी चोरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही चोरी रोखण्यासाठी नगरपालिकेकडून लवकरच शहरातील प्रत्येक नळ कनेक्शनची तपासणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर फौजदारी गुन्हे, मुख्याधिकाऱ्यांचा इशारा डिसेंबरअखेर नळ कनेक्शन अधिकृत करण्याचे आवाहन

कऱ्हाड : शहरात चोरून नळ कनेक्शन घेतल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत नळ कनेक्शनच्या माध्यमातून पाणी चोरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही चोरी रोखण्यासाठी नगरपालिकेकडून लवकरच शहरातील प्रत्येक नळ कनेक्शनची तपासणी करण्यात येणार आहे.

या तपासणीत अनधिकृत नळ कनेक्शनद्वारे पाणी वापरत असल्याचे आढळल्यास अशा नळ कनेक्शनधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिला आहे.अनधिकृतपणे चोरून नळ कनेक्शनची जोडणी करून शहरातील अनेक भागांत काही नागरिकांकडून पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गंभीर दखल घेतली आहे.

लवकरच शहरातील नळ कनेक्शनची तपासणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तपासणीदरम्यान चोरटे नळ कनेक्शन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा डाके यांनी इशारा दिला आहे.

तसेच, जर शहरातील कोणत्याही भागात अशा प्रकारे अनधिकृतपणे कोणी चोरून पाणी वापरत असल्यास नागरिकांनी ते पालिकेच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.

ही कठोर कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत नळ कनेक्शनधारकांनी स्वतःहून ३१ डिसेंबरपर्यंत आपले कनेक्शन नियमित करण्यास इच्छुक असल्याचे कळववावे, अशी नळकनेक्शन पालिका संबंधितांकडून दंड भरून घेऊन नियमित करून देईल. मात्र, त्यानंतरही कोठेही पाणी चोरी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी डाके यांनी दिला आहे.

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिकाKaradकराड